१ जानेवारी भीमाकोरेगाव लढाईचा शौर्य दिन जळगाव शहरात उत्साहात साजरा

0
22

जळगाव, प्रतिनिधी । बहुजन क्रांती मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ भीमाकोरेगाव लढाईच्या २०४ विजय शौर्य दिन व मशाल रॅली चे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी रॅली ची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या ला अभिवादन करून रॅली सुरुवात करण्यात आली तद्नंत रॅली ही रेल्वे स्टेशन जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येऊन त्या ठिकाणी रॅली चे अभिवादन सभे मध्ये रूपांतर झाले.

यावेळी या प्रबोधनात्मक सभेचे उद्घाटक सुमित्र अहिरे (खान्देश प्रभारी, बामसेफ) तसेच विजय स्तंभ पूजन जयश्री सुनील महाजन (महापौर, जळगाव म.न.पा) यानी केले. यावेळी प्रमुख वक्ते दिपाली पेंढारकर (भारतीय विद्यार्थी मोर्चा), राजुभाऊ खरे (जिल्हा संयोजक बहुजन क्रांती मोर्चा) यांनी त्याचे विचार मांडले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान हे प्रा. डॉ. प्रकाश कांबळे (SNDT महिला महाविद्यालय) यांनी केले. यावेळी अध्यक्ष भाषणमध्ये डॉ. साहेब म्हणाले आपला बहुजन महापुरुषांचा इतिहास आपण विसरून चालणार नाही आपला इतिहास आपणस माहीत पाहिजे आपण सर्वांनी एकत्र येऊन लढले पाहिजे.

यावेळी कार्यक्रम चे सूत्रसंचालन रविंद्र सोनवणे प्रस्ताविक सुनील देहडे (शहर संयोजक) यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय सुरवाडे यांनी केले,तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवानंद निकम, सुकलाल पेंढारकर, खुशाल सोनवणे, राहुल सोनवणे, रवींद्र सोनवणे,मुकेश सावकारे,कपिल जाधव, विशाल अहिरे, अमजद रंगरेज, इरफान शेख, जितेंद्र वानखेडे, अजित भालेराव,शुभम अहिरे बहुजन क्रांती मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा जळगाव शहर युनिट मधील सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here