जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन (रेझिंग डे) निमित्त गांधी उद्यानमध्ये बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत संपन्न झाले आहे.
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन (रेझिंग डे) निमित्ताने गांधी उद्यान येथे पोलीस बँड पथकांच्या आवाजात सकाळी १० वाजता पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, डीवायएसपी चंद्रकांत गवळी, पोलीस उपाधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाले. ज्येष्ठ नागरिक रजनी महाजन, आशा तळेले, मधुकर झांबरे, उमेश पाटील यांचे तसेच डीवायएसपी ससे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, पोलीस निरीक्षक कुंभार, पोलीस निरीक्षक ठाकुरवाड, पोलीस निरीक्षक सोनवणे व सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. सकाळी १०.४५ वाजता पोलीस बँड पथकाच्या आवाजात राष्ट्रगीताने संपन्न झाले आहे. रेझिंग डे निमित्त दि. २ जानेवारी ते ८ जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.