यावल, प्रतिनिधी । फैजपूर भाग उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयापासून अंदाजे आठ ते दहा किलोमीटर अंतरावर रेशनिंगचा पावणेदोन लाख रुपये किमतीचा अवैध तांदूळ वाहतूक करणारा ट्रक सावदा पोलिसांनी पकडल्याने महसूल यंत्रणेची निष्क्रियता आणि भ्रष्टाचार,गैरप्रकार उघड झाला आहे याकडे प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी यावल व रावेर तालुक्यातील संपूर्ण रेशन दुकानदारांची कसून चौकशी केल्यास अनेक स्वस्त धान्य/रेशन दुकानदाराकडून झालेला कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार गैरप्रकार आणि अवैध संपत्ती प्रॉपर्टी उघडकीस येईल असे सर्वसामान्य जनतेत बोलले जात आहे.
गेल्या महिन्यापूर्वी आणि गेल्या वर्षी यावल आणि रावेर तालुक्यात रेशनिंगचा तांदूळ वाहतूक करणारे ट्रक यावल, सावदा,रावेर,पोलिसांकडून पकडण्यात आले होते आणि आहेत आणि आणि याबाबत संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे तरी सुद्धा यावल रावेर तालुक्यातील महसूल यंत्रणा निष्क्रिय ठरत असून रेशनचा तांदूळ काळ्याबाजारात अवैधरित्या वाहतूक होत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रावेर तालुक्यात असलेल्या सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुप्त माहिती वरून दि.२७ डिसेंबर २०२१ रोजी रात्री १०-५५ वाजेच्या सुमारास पोलिसांनी रावेर कडून सावदा कडे येणाऱ्या एका ट्रकला वाघोदा बु.येथे प्रगती टोल काट्या समोर येत असता त्या ट्रकला थांबविला असता ट्रक सोडून थेट चालक पसार झाला.त्यात ९८ किंटल अवैध तांदूळ विविध रंगाच्या प्लास्टिक गोण्यांमध्ये आढळून आला.तरी फक्त अवैध तांदूळ बाबतचा उल्लेख फिर्यादीत नमूद केल्यानुसार सदरील तांदूळ अवैध कसे?यासंदर्भात (अवैध) या शब्दाचा अर्थ बोध होतांना दिसत नाही? म्हणून ही बाब मात्र समजण्या पलीकडची आहे.तरी ह्या मालाची बाजारभावाप्रमाणे किंमत १,७२,८०० रुपये असून जप्त केलेल्या मालवाहू ट्रक नं. एम.एच.१९झेड १२७४ याची किंमत ४ लाख रूपये इतकी असून एकूण ५ लाख ७२ हजार ८०० चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलेला असून याबाबत अज्ञात इसमा विरुद्ध गुरनं.१९८/२०२१ अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अन्वेय कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हाची नोंद सावदा पोलिस ठाण्यात करण्यात आलेली आहे.सदर प्रकरणी पोलीस नाईक मेहरबान बशीर तडवी यांनी फिर्याद दिलेली आहे. पुढील तपास ए.पी.आय.देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, समाधान गायकवाड हे तपास करीत आहे.
प्रसिद्धी माध्यमांमध्ये वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध होत असल्याने रेशन दुकानदारांकडून मासिक हप्ते घेणाऱ्या काही दलाल व मध्यस्ती तसेच अधिकारी-कर्मचारी काही पदाधिकारी,प्रतिनिधी मध्ये सुद्धा रेशनिंगचा माल काळ्याबाजारात जात असल्याची जोरदार चर्चा असून ही सर्व यंत्रणा हप्ते देणाऱ्यांना जाब विचारत असून तुम्ही त्यांना हप्ता देत नाही का? प्रसिद्धीमाध्यमांना बातम्या प्रसिद्ध का होत आहेत?असे असे सुद्धा हप्ते घेणाऱ्यांमध्ये बोलत आहेत.
प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी यावल रावेर तालुक्यातील शासन मान्य काही ठराविक स्वस्त धान्य परवाना मिळालेल्या दुकानदारांच्या जंगम/स्थावर मालमत्तेची प्रत्यक्ष खात्री आपल्या महसूल सचिव व महसूल विभाग,आयकर विभागामार्फत,आर्थिक गुन्हे शाखेमार्फत,व ईतर यंत्रणेमार्फत केल्यास यावल रावेर तालुक्यात कोट्यावधी रुपये नव्हे तर अब्जावधी रुपयाचा महाघोटाळा उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही असे बोलले जात आहे. जळगाव जिल्ह्यात काळ्याबाजारात रेशन माल/ धान्य,विक्री करणाऱ्या काहींची माहिती आणि पुरावे संकलन करण्याचे कार्य सुरू असून याबाबत वरिष्ठ स्तरावर तक्रारी दाखल झालेले असल्याने संबंधित विभागामार्फत लवकरच चौकशी सुरू होणार असल्याची खात्री शीर पुराव्यासह माहिती आहे असे बोलले जात आहे.
सावदा पोलिसांनी पकडलेला ट्रक कोणाच्या मालकीचा आहे त्यातला अवैध तांदूळ कोणी कुठून कसा संकलित केलेला आहे आणि तो तांदूळ कोणत्या ठिकाणाहून कुठे जात होता इत्यादी चौकशी करण्याचे आवाहन सावदा पोलिसांना असले तरी कड़क कारवाई होऊ नये म्हणून “संबंधित” सावदा पोलिसांवर राजकीय प्रभाव टाकत असल्याचे सुद्धा यावल रावेर तालुक्यात बोलले जात आहे.