भुसावळात तब्बल ३३ किलो गांजा जप्त, बाजारपेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल

0
20

भुसावळ, प्रतिनिधी । येथील बसस्थानक परिसरात आज पहाटेच्या सुमारास तब्बल ३३ किलो गांजा जप्त करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने सापळा रचून तब्बल ३३ किलो गांजा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. रावेर येथील ब्राऊन शुगर नंतर गांजाबाबत करण्यात आलेली कारवाई ही महत्वाची मानली जात आहे. बाजारपेठ पोलीस स्थानकाचे निरिक्षक दिलीप भागवत यांना एका वाहनातून भुसावळच्या बसस्थानक परिसरात गांजा येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानुसार त्यांनी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले. या पथकाने बसस्थानकाच्या परिसरात पहाटे साडेतीनच्या सुमारास वाहन अडविले असता त्यात ३३ किलो वजनाइतका गांजा आढळून आला.

याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here