भाजपाच्या अल्पसंख्याक महिला मोर्चाच्या महानगर जिल्हाध्यक्षापदी सना जहांगीर खान

0
9

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरचे जिल्हाध्यक्ष मा.दिपक सुर्यवंशी यांनी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व भाजपच्या कार्यकर्त्या सना जहांगीर खान यांची अल्पसंख्यांक महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. त्यांना नुकतेच शहराचे आमदार व जिल्हाध्यक्ष ग्रामीण मा. सुरेश भोळे(राजूमामा) आणि जळगाव जिल्हा महानगरचे जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

सना जहांगीर खान ह्या मुक्ताईनगर तालुक्यापासून ते जळगाव जिल्ह्यापर्यंत त्यांनी अनेक पदे भूषवल. त्या १९९३ पासून भारतीय जनता पार्टीच्या सदस्या आहेत. २०१२ ते २०१४ पर्यंत जिल्हा चिटणीस, २०१४ ते २०२० जिल्हा उपाध्यक्षा, अल्पसंख्यांक सेवा संघ जिल्हा अध्यक्ष, मायनोरीटी एजुकेशन वेल्फेअर सोसायटी अध्यक्षा, महिला विकास फौंडेशनच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. महिलांच्या अनेक प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतात.

सना खान या सतत भाजपाशी निगडीत असून पक्षाचे मोर्चे, आंदोलने, कार्यक्रम बैठकांमध्ये अग्रेसर असतात. त्यांना देण्यात आलेल्या जबाबदारी बद्दल माजी मंत्री आ.गिरीशभाऊ महाजन, उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटन मंत्री रवीजी अनासपुरे, आ.सुरेश भोळे(राजु मामा), जळगाव जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी, खा.रक्षाताई खडसे, खा. उन्मेष पाटील, मा.आ. चंदू भाई पटेल माजी आमदार स्मिताताई वाघ, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा उज्ज्वलाताई बेंडाळे, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष दिप्तीताई चिरमाडे, रेखाताई पाटील, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अॅड शहबाज शेख, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष आरिफ शेख, साबीर(गुड्डू)पठाण,उपाध्यक्ष मोहमद शेख, अल्पसंख्यांक युवा मोर्चा अशफाक शेख यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here