जामनेर, प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येत सुधाकर मोहने यांच्या शेतातून ठिबक फिल्टरच्या जाळ्या, रबर, झाकन, कॉक असे जवळपास ५ ते ६ हजार रुपये किमतीच्या वस्तू दिनांक २४ शुक्रवार रोजी रात्रीला चोरी गेल्या, तसेच पिंपळगाव खुर्द येथील अनिल पाटील यांच्या शेतातून मोटार केबल चोरीला गेली, असून चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातल्याचे दिसून येते आहे.