जळगाव ः प्रतिनिधी
बीएचआरप्रकरणात पुण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेने जळगावातील खान्देश मील कॉम्प्लेक्समधील दोन गाळे सील केले होते.या गाळ्यांमध्ये इतर कंपन्यांचे कार्यालय असल्याने १५ जानेवारीपर्यंत गाळ्यांचे सील काढण्याचे आदेश पुणे न्यायालयाने दिले आहेत.
खान्देश मिल कॉम्प्लेक्समध्ये शॉप क्रमांक ४२ आणि ४३ हे पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ नोव्हेंबर २०२० रोजी सील केले आहे. बीएचआर प्रकरणाचा तपास करण्यासाठी आवश्यक ते सर्व कागदपत्रे येथून घेऊन हे कार्यालय सील केले होते. यासंदर्भात या ठिकाणी कार्यालय असलेल्या सुरज सुनील झंवर, सालासर ट्रेडिंग कंपनी, दीपक श्रीपतराव शिंदे, सुनील श्यामलाल कलंत्री, युगश्री जयसाई वेअर हाऊस प्रा.लि. श्री साईबाबा कोल्डस्टोरेज, श्री साई मार्केटिंग अॅण्ड ट्रेडिंग कंपनी यांनी डेंकन पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यासंर्दभात न्यायालयात धाव घेऊन यांचे कार्यालय असलेल्या शॉप नंबर ४२ आणि ४३ चे सील काढण्याची मागणी केली होती.त्यानुसार पुणे न्यायालयाने १२ जानेवारी रोजी दोन्ही शॉपचे सील काढण्याचे आदेश दिले आहेत.