यावल, प्रतिनिधी । भालोद सांगवी रस्त्यावर भालोद कडून यावल येथे येणाऱ्या यावल येथील एका व्यापाऱ्याला रात्री 8 ते 9 वाजेच्या सुमारास रस्त्यात अडवून त्याला मारहाण करून त्याच्या जवळील रोख रक्कम हिसकावून अज्ञात लुटारू फरार झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की नेहमीप्रमाणे यावल येथील व्यापारी भालोद येथून आपल्या दुकानातून रोख रक्कम पंधरा ते वीस हजार रुपये यावल येथे घेऊन येत असताना अज्ञात लुटारूंनी भालोद सांगवी रस्त्यावर व्यापाऱ्याची मोटरसायकल अडवून मोटार सायकलची चावी काढून घेऊन चाबी अंधारात फेकून,मोबाईल सुद्धा अंधारात फेकुन दिला व व्यापाऱ्या जवळील रोख रक्कम वीस हजार रुपये घेऊन अज्ञात लुटारूंनी पळ काढला या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे घटना घडून चार पाच दिवस झाले असले तरी संबंधित व्यापाऱ्यांने फैजपूर किव्वा यावल पोलीस स्टेशनला फिर्याद न दिल्यामुळे नोंद नसल्याचे समजले.