राजकीय नेते समाज सेवकांना धमकी देणे पडणार महाग

0
15
भुसावळात आढळला एक नवीन रुग्ण; संख्या चारवरून पाचवर

मुंबई, वृत्तसंस्था । मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी चा  विषय चांगलाच गाजला.   राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांना धमकी देणाऱ्याची कठोर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी विरोधक आणि  सत्ताधारी यांनी एकत्रित येऊन केली. याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली .

मुंबईतील  विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दुसऱ्या दिवशी मंत्र्यांना दिल्या जात असलेल्या धमकी प्रकरणावर चर्चा करण्यात आली. यावेळी विरोधक व सत्ताधारी यांनी धमकी प्रकरणी चौकशी करण्यासाठी सदस्यांची समिती गठीत करावी, अशी मागणी केली. याप्रकरणी मंत्री आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीच्या फोनबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, या प्रकरणी आरोपीना अटक करण्यात आलेली आहे. संबंधित आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.

मंत्री आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणे इतरही धमकी प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून केली जाईल. यासाठी उच्च स्तरावर माहिती घेतली जाईल. तसेच एसआयटीची स्थापना केली जाईल. त्याद्वारे यापुढे अशा प्रकारचे धमकीचे प्रकार घडणार नाही, याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिले जाईल, असे गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.

आरोपीला बेंगरूळ येथे अटक 
राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या 34 वर्षीय आरोपीला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून आरोपीला बंगळूरु येथून अटक केली आहे. आदित्य ठाकरे यांना त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आरोपीने संदेश पाठवून धमकी दिली होती. आरोपीने व्हॉट्सअ‍ॅप संदेशात अभिनेता सुशांर्तंसह राजपूतच्या मृत्यूबाबत ठाकरे यांच्यावर आरोप केले होते.

काय आहे प्रकरण ?
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला बंगळुरुमधून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी जयसिंग राजपूत याने 8 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 च्या सुमारास सर्वप्रथम आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवला होता. त्या मेसेजमध्ये त्याने सुशांत सिंहच्या मृत्यूबाबत आरोप केले होते. त्यानंतर त्याने तीन फोनही केले. आदित्य ठाकरेंनी ते फोन उचलले होते. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसा मेसेज त्यांने  आदित्य ठाकरेंना पाठवला होता. याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, 34 वर्षीय आरोपी जयसिंग राजपूतला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून अटक करण्यात आली आहे. सायबर पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला. त्यावेळी आरोपी बंगळूरु येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार बंगळूरु येथून राजपूत याला अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here