भुसावळ, प्रतिनिधी । भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील नीती आणि सामाजिक शास्त्र मंडळांतर्गत अल्पसंख्यांक दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए.डी गोस्वामी होते. यावेळी व्यासपीठावर मराठी विभाग प्रमुख डॉ .के .के . अहिरे, प्रा एस. के . राठोड , माजी विद्यार्थी अदनान अहमद उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य डॉ . ए .डी गोस्वामी म्हणाले- भारत हा विविधतेने नटलेला देश आहे .भारतामध्ये वेगवेगळे प्रांतात भाषा ,जात, धर्म ,आहेत. संविधानाने अल्पसंख्यांकाचा दर्जाचा प्राप्त झाला असून सर्वांना समान न्याय दिलेला आहे असे मत त्यांनी मांडले.
तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानस नीती व सामाजिक शास्त्र मंडळाचे चेअरमन प्रा.एस के राठोड यांनी केले. प्रास्ताविका ते म्हणाले – 18 डिसेंबर ला अल्पसंख्यांकांच्या अधिकाराला चालना देण्यासाठी संपूर्ण जगामध्ये अल्पसंख्यांक दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणुन नाहाटा महाविद्यालयातील माजी विद्यार्थी अदनान अहमद यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने अल्पसंख्यांक यांच्या रूढी परंपरा, भाषा,धर्म, जात, ह्या सगळ्या वेगवेगळ्या असल्या तरी अल्पसंख्यांकाच्या आणि त्यांना, मिळणाऱ्या न्याय भारत हा विविधतेने नटलेला देश आहे भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा समुदाय आहे.
डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलेला आहे . त्या संविधानामध्ये लोकशाही आणि सर्वांना समान वागणूक दिली जाते. असे मत त्यांनी मांडले. त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी सूत्रसंचालन महाविद्यालयातील प्रा. भूपेंद्र बानाईत यांनी केले. तर आभार डॉ. डी.एम.टेकाडे यांनी मानले तर कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील डॉ. जे. एफ. पाटील, डॉ. पी. ए. अहिरे, प्रा.एस. टी. धूम, डॉ. आर. एस. नाडेकर, डॉ. के. ए वारके, डॉ पी.एच.इंगोले,प्रा.ए.पी. नवघरे, डॉ. मनोज पाटील, डॉ. राजेंद्र तायडे, डॉ. ललित तायडे, प्रा. पुरुषोत्तम महाजन, प्रा. दीनानाथ पाठक यांच्यासह प्राध्यापक, प्राध्यापिका आदी उपस्थित होते .