यावल, प्रतिनिधी । यावल नगरपरिषद कार्यक्षेत्रातील गाळ,कचरा,डेब्रिज वाहतूक द्वार द्वार कचरा संकलन कामाच्या ठेक्याची प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकाऱ्यांनी न दिल्याने यावल नगरपरिषदेने पुन्हा तो ठराव/विषय दि.23 डिसेंबर 2021रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी घेतल्याने जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयात यावल नगरपालिकेचा “कचरा” झाला? तसेच यावल नगरपालिकेचा कारभार पाहणाऱ्यांच्या बौद्धिक क्षमतेची सुद्धा चर्च्या सपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यातील राजकारणात सुरु झाली आहे.
दि. २३ रोजी होणाऱ्या सर्व साधारण सभेचा अजंठा बघितला असता विषय क्र.21असा घेतला आहे की,घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शहरातील गाळ, कचरा,डेब्रिज वाहतूक व द्वार ते द्वार कचरा संकलन व अनुषंगिक कामाकरिता नवीन निविदा प्रक्रिया राबवून कार्यादेश होई पर्यंत सध्या सुरु असलेल्या कामास (कचरा संकलन करणाऱ्या त्याच आपल्या ठेकेदारास) मुदतवाढ ही मा.जिल्हाधिकारी सो.,जळगाव यांच्या प्रशासकीय मान्यतेस अधीन राहून देण्यात आली होती. परंतु नुसार मा.जिल्हाधिकारी कार्यालय.जळगाव (नगरपालिका शाखा) यांकडील पत्र जा.क्र.पालिका| ३/कावि/२०२१।२४४ दिनांक ०१/०९/२०२१ अन्वये मुदतवाढ कालावधी प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकारी यांनी ” न” देवून प्रकरण निकाली काढले.तदनंतर पुन:श्च नगरपालिककेची आर्थिक परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांना विनंती पत्र देण्यात आले त्या अनुषंगाने संदर्भ ५ नुसार मा.जिल्हाधिकारी कार्यालय.जळगाव
(नगरपालिका शाखा) यांकडील पत्र जा.क्र.पालिका-३/कावि/२०२१४२९३ दिनांक २२/१०/२०२१ अन्वये मुदतवाढ कालावधी प्रशासकीय मान्यता “न” देवून प्रकरण निकाली काढले असे.सदर कामाच्या मक्तेदारास सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरीता निविदा प्रक्रिया अंतिम होई पावेतो सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील वार्षिक दर करार मंजुर अभिकर्ता यांना मुदतवाढ देण्यात आली असून मा.अध्यक्षा यांच्या ५८/२ आदेशान्वये सदर कामा करीता १५ वा वित्त आयोगातून खर्चास पूर्वलक्षी प्रभावाने वेळोवेळी नवीन निविदा कार्यादेश होई पर्यंत मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.तथापी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शहरातील गाळ कचरा,डेब्रिज वाहतूक व द्वार ते द्वार कचर संकलन व अनुषंगिक कामाकरिता कामांकरिता ५८/२ अन्वये अंतर्गत मंजुरी प्रदान केलेल्या कामास व खर्चास मंजुरी प्रदान करणे करीता चर्चा करून निर्णय घेणे करीता सभे समक्ष मंजुरीस्तव विषय घेतला आहे.
यासोबत दूसरे काही विषय पण चर्चेसाठी घेतलेले आहेत.ते पुढील प्रमाणे आहेत यावल न.प. गट नं ७०८ बगीचे मधील वाढीव काम करणे आवश्यक आहे. सदर काम करणेकामी क्र.22 मंजुरी साठी विषय सभेपुढे सादर.विषय यावल न.प. गट नं ४६ विरार नगर बगीचे मधील वाढीव काम करणे आवश्यक आहे. सदर काम क्र.23 करणेकामी मंजुरी साठी विषय यावल न.प.हद्दीतील प्रभाग क्र. 9 मोठा मारुती जवळ राहूल धनगर च्या समोर काँक्रीट रोड व गटार क्र.24 तयार करणे कामी राहूल धनगर यांचे न.प.कडे वारंवार अर्ज सादर केले होते. त्यानुसार न.प.अभियंता यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली असता सदर काम करणे आवश्यक असल्याने मंजुरी साठी विषय घेतला.
यावल नगरपरिषदेचे मायनेट मधील कामकाज करणेसाठी व प्रकल्पाला तांत्रीक सहाय्यसाठी अमोल क्र.25 लक्ष्मण शिंदे यांना यावल नगरपरिषदेमध्ये कल्याण डोबिंवली महानगरपालिकेच्या धर्तीवर ई-गव्हनर्स प्रकल्पाअंतर्गत प्रकल्पामार्फत विविध प्रणालीचे कामकाज शासनाचे आदेशान्वये दि.31.12.2017 पासुन सदर प्रकल्पास देण्यात येणारी सेवा बंद झाल्यामुळे सदर कामकाजावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.तरी यावल नगरपरिषद कार्यालय अधिक्षक यांचे शिफारशी नुसार व दि.16/02/2021 चे दै जनशक्ती वर्तमान पत्रात दिलेल्या जाहीर निविदा सुचनेवरुन आपली सर्वत कमी रकमचे रु 25500/- मात्र ची निविदा मे स्थायी समिती सभा ठाराव क्र 82 , दि.26/03/2021 ने
मंजूर झाली असुन आपणास या आदेशाने आपणास दि. 1/04/2021 ते दि. 28/02/2022 पर्यंत कार्यादेश देण्यात आला होता परंतु आगामी काळात निवडणूक असल्याने व पुढील कालावधीत निविदा प्रक्रिया पुर्ण होऊ शकत नसल्यने अमोल लक्ष्मण शिंदे यांना माहे मार्च 2022 पासुन पुढील सहा महिन्यासाटी मुदत देणेकामी विषय,गट नं 753 मध्ये फाईवर शेड उभारणेचे काम करणे सदर काम अर्थ संकल्पीय तरतुदीचे मर्यादीत
क्र.26 प्राधान्यक्रमाने कामे करता येतील सबब योग्य तो निर्णय घ्यावा व प्राधान्यक्रम निश्चित करावा.विषय-पराग बोरोले यांचं घरासमोर पासुन ते आयशा नगर गेट जवळ डांबरीकरण करणे क्र.27 संकल्पीय तरतुदीचे मर्यादीत प्राधान्यक्रमाने कामे करता येतील सबब योग्य तो निर्णय घ्यावा व प्राधान्यक्रम निश्चित करावा. प्राधान्यक्रम निश्चित करावा. अशाप्रकारे सभेत विषय घेण्यात आले आहेत.
परंतु घनकचरा वाहतुकीचा ठेक्या संदर्भात सभेत अध्यक्ष यांना 58/2आदेशान्वये कायदेशीर चर्चा करण्यात येते का?अध्यक्ष यांना या विषयाबाबत कायदेशीर ज्ञान होते का? किव्वा आहे का? किंवा फक्त बिल काढण्यासाठी घनकचरा वाहतूक ठेकेदाराकडून दिशाभूल केली जात आहे का? आणि असे झाल्यास यापुढे जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे काही माहितगार तक्रारी करणार असून निर्णयाअंती दिलेल्या बिलाची रक्कम संबंधितांकडून वसूल केली जाईल असे सुद्धा यावल शहरात बोलले जात आहे.