देशातील वस्तुस्थिति लोकांपर्यंत पोहचण्याची गरज – योगेन्द्रसिंग पाटील

0
89

यावल तालुका कॉंग्रेस भव्य मेळावा संपन्न

यावल, प्रतिनिधी । स्वातंत्रपुर्व काळापासुन दोन विचारधारा देशात होती यात सर्वधर्मसमभाव व जहाल विचारधारा तेव्हा सुरवाती पासुन देशाच्या सभोवतालचा विचार करणाऱ्या कॉग्रेस पक्षा सोबत जनता होती मात्र, गेल्या काही वर्षात सत्तांतर नंतर देशात महागाई वाढली, शेतकरी विरोधी धोरण, युवक बेराजगारी वाढली तेव्हा या प्रत्येक्ष परिस्थितीची वास्तवता लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील यांनी केले ते बुधवारी यावल शहरात जिल्हा परिषद,पंचायत समिती सह आगामी काळात होवु घातलेल्या विविध संस्थाच्या निवडणुकच्या निवडणुकी संर्दभात घेण्यात आलेल्या मेळाव्यात बोलत होते.
बुधवारी शहरातील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या आवारात कॉग्रेस कमेटीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्दघाटन प्रदेश निरिक्षक दिप चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले तर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कॉग्र्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार होते प्रारंभी शहीद बिपीन रावत यांना श्रध्दंजली वाहण्यात आली. मेळाव्यात प्रमुख उपस्थितीत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार शिरिष चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील, प्रदेश सचिव विनोद कोळपकर, जिल्हा बँकेचे संचालक विनोद पाटील, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुनवर खान, महीला आघाडी जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, पंचायत समितीचे गटनेता शेखर पाटील, भगतसिंग पाटील, नितीन चौधरी, उमाकांत पाटील, राजु पटेल, सरफराज तडवी, कलीमाताई तडवी, मागसवर्गीय जिल्हाध्यक्ष प्रतिभा मोरे, चंद्रकलाताई इंगळे, विवेक नरवाडे, सुनिल फिरके, शरद पाटील, हाजी ताहेर शेख, अमोल भिरूड, गटनेता सैय्यद युनूस, नगरसेवक शेख असलम, समीर मोमीन, जाहिर शेख सह मान्यवरांची व्यासपिठावर उपस्थिती होती तर या मेळाव्यात केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरण, देशात वाढलेली बेराजगारी, वाढलेली महागाई या मुळे सर्वसामान्यास जगने मुस्कील झाले असुन आगामी निवडणुकीत मतदारांना या वास्तवता असलेली माहिती देणे गरजेचे असुन या कामी युवकांचे संघटन बांधनी महत्वाची आहे असे राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील यांनी सांगीतले, मेळाव्यात तालुका, शहर काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस, अल्पसंख्यांक सेल, वैद्यकीय आघाडी, किसान सेल,मागासवर्गीय, आदिवासी व ओबीसी सेल सह पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पक्षाचे लोकप्रतिनिधींना उपस्थित होते या प्रसंगी मजी खासदार डॉ. उल्हास पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, शेखर पाटील, हाजी शब्बीर खान, भगतसिंग पाटील, किशोर महाजन सह आदींनी मनोगत व्यक्त केले व पुढील काळात युवकांचे संघटन मजबुत करण्यावर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, यांची तर सुत्रसंचालन प्रदिप सोनवणे यांनी केले मेळाव्याच्या यशस्वीते करीता शहराध्यक्ष कदीर खान, फैजपूर शहराध्यक्ष शेख रियाज, उपाध्यक्ष अनिल जंजाळे, सय्यद अखलाक, शेखर तायडे, बशीर तडवी पुष्पाताई झाल्टे, जितेंद्र चौधरी, सैय्यद वसीम जनाब, हाजी गफ्फार शाह, मारूळ सरपंच सैय्यद असद अली दहिगाव सरपंच अजय अडकमोल, विवेक सोनार, रहेमान खाटीक, पुंडलीक बारी, अजय बढे, वसीम तडवी, विक्की सोनवणे, नईम शेख,विक्की गजरे, समाधान पाटील आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here