श्रीरामांचा जयघोष करीत रांगोळीतून साकारले रामायणातील सुरेख प्रसंग

0
40
DCIM100MEDIADJI_0898.JPG

जळगाव ः प्रतिनिधी
भव्य अशा मैदानावर पन्नास बाय शंभर फुटावर रांगोळीद्वारे साकारण्यात आलेले राममंदिर‘ त्यावर सायंकाळी ठेवण्यात आलेले ५ हजार १ दिवे’ पाचशे बालराम भक्तांची उपस्थिती अन् प्रभू श्रीरामचंद्र की जय असा जयघोष… असे भक्तीमय वातावरणात “श्रीराम मंदिर दीपोत्सव’ काल सायंकाळी साजरा करण्यात आला. जळगाव शहर श्रीराम मंदीर निधी संकलन अभियानांतर्गत सचिन मुसळे यांच्याद्वारे मार्गदर्शित ‘श्रीराममंदीर दीपोत्सव’ हा भव्यदिव्य कार्यक्रम रविवारी सायंकाळी ६.३० वाजता ला.ना. शाळेच्या मैदानावर पार पडला.
या वेळी बालकांसह नागरिकांनी “सियावर रामचंद्र की जय’ असा जयघोष केला. या दीपोत्सवात शहरातील विविध शाळांमधील ५०१ बाल रामभक्त सहभागी झाले होते. त्यांनी ५००१ दिवे लावून १५ तासात दिव्यांनी साकारलेले भव्य राम मंदीर तयार करणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आर्किटेक्ट संदीप सिकची, सचिन मुसळे व पदाधिकारी यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्रीरामांची आरती करण्यात आली.
त्यात सहभाग घेणार्‍या प्रत्येक बाल रामभक्तांनी पाच मातीचे दिवे, १० वात व त्या अनुरुप तेल हे साहित्य दीपोत्सवाच्या ठिकाणी सोबत आणाले होते. हे भव्य व विलोभनीय असे दिव्यांच्या रोषणाईने तेजोमयी राम मंदिर अनुभवण्यासाठी पालक व नागरिकांची उपस्थिती होती. दरम्यान, सायंकाळी अंधारात दिव्यांनी साकारलेल्या श्रीराम मंदिराने संपूर्ण परिसर उजळून निघाला.
यांनी साकारली रांगोळी
सचिन मुसळे ड्रॉईंग क्लासचे विद्यार्थी हर्षल कदम, भावेश बागुल, उदय नेरकर, चेतन पाटील, रितू बन्सल, दर्शन वाणी, काजल सैनी, युगल चौधरी, गौरव पाटील, भानुदास माळी, निखिल तिवारी यांसह क्लासचे संचालक मुसळे यांनी ही भव्यदिव्य राममंदिराची प्रतिकृती रांगोळीद्वारे साकारली.
श्रीराम मंदीर निधी समर्पण अभियानानिमित्त “मातृशक्ती’तर्फे शहरातील विविध वस्तीत महिलांनी ‘राम जन्मला गं सखे राम जन्मला.. ते कुश लव रामायण गाती…’ अशा रामायणातील विविध प्रसंग रेखाटणारी व अशा प्रसंगांवर आधारित रांगोळी काढली.या वेळी मास्क व शारिरिक अंतर राखले.त्यात शहरातील आनंदनगरच्या सर्व महिला सदस्यांनी एकत्र येऊन १२ बाय ७ फुटाची भव्य रांगोळीत रामजन्म व लंकादहन असे दोन प्रसंग अतिशय सुरेख रेखाटले. ही रांगोळी १८ सदस्यांनी ६ तासांत रेखाटली.
श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानांतर्गत ला.ना. शाळेच्या मैदानावर “श्रीराम मंदिर दीपोत्सव’ कार्यक्रमाप्रसंगी सचिन मुसळे ड्रॉइंग क्लासच्या विद्यार्थिनींनी रांगोळीतून साकारलेलेे रामायणातील हे दोन प्रसंग रेखाटले. त्यातील रंगसंगती, भावभावना व प्रसंगांचे गांभिर्य हे लक्षवेधी असेच ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here