जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील मराठी प्रतिष्ठान व रामलाजी चौबे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दुचाकी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम रविवारी सकाळी मोटेल कोझी कॉटेज, सागर पार्कसमोर महापौर भारतीताई सोनवणे, आयुक्त सतीश कुळकर्णी, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, माजी महापौर नितीन लढ्ढा, पीपल बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, अॅड.शुचिता हाडा, रामलालजी मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश चौबे यांच्या उपस्थितीत झाला.
महापौर भारतीताई सोनवणे यांचा हस्ते दुचाकी रुग्णवाहिकेवरील कापडी अनावरण काढून उद्घाटन करण्यात आले. ना नफा ना तोटा या तत्वावर शहरातील रुणांना दवाखान्यातून घरी अथवा घरुन दवाखान्यात ने-आण करण्यासाठी ही सेवा उपलब्ध होणार आहे. दुचाकी रुग्णवाहिका सेवा महाराष्ट्रात प्रथमच जळगाव येथे सुरू होत आहे. ‘लाइफलाइन’ या नावाने सुरू होणार्या या सेवेला चौबे ट्रस्टने आर्थिक सहाय्य केले आहे.
मराठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुचाकी रुग्णावाहिका सेवा संचलित केली जाणार आहे.दुचाकी रुग्णवाहिकेची अंतर्गत /बाह्य सजावट आटो आयकॉन जळगाव यांनी केली आहे. मराठी प्रतिष्ठानचे अॅड जमील देशपांडे यांनी रुग्णवाहिकेची माहिती दिली सचिव विजय वाणी, उपाध्यक्ष सतीश रावेरकर, अनुराधा रावेरकर, संध्या वाणी, निलोफर देशपांडे यांनी नियोजन केले.सागर चौबे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश चौबे यांनी आभार मानले.