थ्री स्टार दर्जाचा पुरस्कार जळगावकरांसाठी भूषणावहच

0
41

जळगाव, प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आज शनिवार, दि. 20 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजिलेल्या ‘स्वच्छ अमृत महोत्सव’ 2021 अंतर्गत कार्यक्रमात कचरामुक्त शहरासाठीचा जळगावला 3 स्टार रेटिंग हा पुरस्कार गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी छत्तीसगडचे नागरी प्रशासन आणि विकास राज्यमंत्री डॉ.शिवकुमार डहरीया व स्वच्छ भारत अभियानाच्या संचालिका व सहसचिव श्रीमती रूपा मिश्रा यावेळी उपस्थित होत्या. समस्त जळगावकरांच्यावतीने आज मी व उपायुक्त श्री.पवन पाटील यांनी तो स्वीकारला.

खरंतर शहरातील नागरिक विविध अडचणींचा सामना करताना मेटाकुटीस येतात. मात्र, सामंजस्य अन् सजगतेचा प्रत्यय आणून देत कचरा विलगीकरणाच्या प्रक्रियेत ते अग्रस्थानी राहिले. त्यासाठी ‘महापौर सेवा कक्षा’च्या माध्यमातून वारंवार केले जाणारे आवाहन व समन्वयही तितकेच महत्त्वपूर्ण ठरले. त्यामुळेच महाराष्ट्रातील 69 शहरांमध्ये जळगावचा समावेश होऊन केंद्र सरकारचा कचरामुक्त शहरासाठीचा थ्री स्टार दर्जाचा पुरस्कार प्राप्त झाला, ही जळगावकरांसाठी भूषणावह बाब आहे. याबद्दल समस्त जळगावकर, महापालिकेच्या आरोग्य विभागासह या अभियानात सहभागी सर्व अधिकारी-कर्मचार्‍यांचे मी मनापासून कौतुक करते व आभारही मानते. हे सर्व शक्य झालं ते जळगावकरांमुळेच. भविष्यातही उत्तमोत्तम कामगिरी करून आपण यापुढील दर्जा प्राप्त करण्याचा प्रयत्न करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here