राकाँच्या पदाधिकाऱ्यांनी आकाशवाणी चौकातील सर्कलचे काम पाडले बंद

0
48

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय राष्ट्रीय प्राधिकरण तर्फे आकाशवाणी चौक , ईच्छा देवी चौक व अजिंठा चौफुली येथे सर्कलचे काम सुरू करण्यात आलेले होते .

जळगाव शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेता याठिकाणी होणाऱ्या सर्कलच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा होऊन लहान मोठे अपघात होऊन जिवीत हानी होण्याची शक्यता लक्षात आल्याने , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर तर्फे दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी उपरोक्त नमुद तिन्ही चौकात सर्कल होऊ नये व उड्डाणपुल बांधण्यात यावे , यामागणीचे निवेदन मा. जिल्हाधिकारी , जळगाव व मा. प्रकल्प अभियंता , भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण , जळगाव यांना देण्यात आले होते . परंतु 5/6 दिवस उलटुन देखील सदर निवेदनाची दखल न घेतल्याने , आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर तर्फे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांसाठी अत्यंत गैरसोयीचे व जीवघेणे ठरणारे आकाशवाणी चौकातील सर्कलचे निकृष्ठ बांधकाम आंदोलन करून बंद करण्यात आले .

आंदोलन स्थळी जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे साहेब , रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे साहेब व जळगाव शहर वाहतूक शाखा चे पोलीस निरीक्षक कानडे साहेब या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकारी यांच्यात समन्वय घडवुन आणण्याचा प्रयत्न केला . परंतु आंदोलक हे त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने चर्चेतून जनहिताचा मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनि चर्चा करण्यासाठी बोलवले आहे असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले . त्यानुसार जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली .

जिल्हाधिकारी अभिजितजी राऊत साहेब यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी आंदोलकांच्या मागणीप्रमाणे आकाशवाणी चौक , ईच्छादेवी चौक व अजिंठा चौफुली येथे उड्डाणपुल बांधणेकामी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याबाबत आश्वस्त केले . पोलीस अधीक्षक प्रवीणजी मुंढे साहेब यांनी सर्कलचे काम सुरू असल्याने जास्त जागा व्यापली आहे म्हणून नागरिकांना ट्रॅफिकचा त्रास होत आहे पण सर्कल पूर्ण झाल्या नंतर नागरिकांना जास्त जागा वापरासाठी मिळेल व ट्रॅफिकची समस्या होणार नाही . असे भारतीय राष्ट्रीय राजमार्गाच्या अधिकाऱ्यांचे मत असल्याचे सांगितले . पण सर्कलचे काम पूर्ण होऊन देखील जर नागरिकांना गैरसोयीचे वाटत असेल तर निश्चितच सर्कलचा व्यास कमी करण्यात येईल . याविषयी सबंधित अधिकारी व मक्तेदार त्यांच्याकडून लेखी घेण्याबाबत आश्वस्त केले .

सदर आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अशोक लाडवंजारी , सुनील माळी सौ. मंगला पाटिल , नामदेवराव चौधरी , रवींद्र नाना पाटिल , अमोल कोल्हे , विनोद देशमुख , सुशील शिंदे , किरण राजपूत , राजू मोरे , अशोक सोनवणे , जितेंद्र बागरे , भगवान सोनवणे , नाईम खाटिक , डॉ. रिजवान खाटिक , राहुल टोके , रमेश बहारे , मुविकोराज कोल्हे , मनोज वाणी , सुदाम पाटिल आदि कार्यकर्ते उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here