जळगाव ः प्रतिनिधी
विवेकानंद निवासी विभागात मुलांच्या निरामय आरोग्यासाठी दररोज सूर्यनमस्कार, योगासन व खेळावर मार्गदर्शन करण्यात येते. विवेकानंद प्रतिष्ठान निवासी विभागातील नववी-दहावीची मुले पुन्हा व्यायाम, खेळासाठी मैदानावर आली आहेत.
ऑनलाइन शिक्षणाच्या वापराने विद्यार्थी कंटाळल्याने तसेच विद्यार्थ्यांमधील प्रतिकार क्षमता वाढावी म्हणून त्यांना व्यायाम, मैदानी खेळाची गोडी लागावी यासाठी विवेकानंद प्रतिष्ठान निवासी विभागातर्फे त्यांना मैदानी खेळांचे मार्गदर्शन विदर्भातील क्रीडा प्रशिक्षक संतोषकुमार वाळसे व संजय अंबोदकर सकाळी व सायंकाळी करीत आहेत. या उपक्रमासाठी संजय कानडे, संजय आंबोदकर, सुनील वाघ, मधुसूदन जोशी, कृष्णा सत्रे, दुलारी प्रजापती यांचे सहकार्य लाभत आहे.विवेकानंद प्रतिष्ठानच्या निवासी विभागातील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली.