जळगाव ः प्रतिनिधी
ऑनलाइन राज्यस्तरीय युवा महोत्सव २०२० नुकताच उत्साहात झाला.त्यात भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे लोकनृत्य सादर करण्यात आले. महाराष्ट्रातून मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, पुणे, लातुर, कोल्हापुर या ८ विभागांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला,त्यात जैन फाउंडेशनला राज्यातून प्रथम क्रमांक मिळाला. संघाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
युवा महोत्सव २०२० महोत्सवात एकपात्री, शास्त्रीय गायन, शास्त्रीय वादन, कथ्थक, बासरी वादन आणि वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आल्या होत्या. लोकनृत्य प्रकारात जैन फाउंडेशनने प्रतिनिधीत्व केले. सहभागी कलावंत अजय गोसावी, रितीक पाटील, निर्मल राजपुत, हेमंत माळी, योगेंद्र बीसेन, सुमीत भोये, रोहन चव्हाण, मंगेश चौधरी, मोईन शेख आदी कलावंत स्पर्धकांचे फाउंडेशनचे विश्वस्त अशोक जैन यांनी कौतुक केले आहे. स्पर्धेसाठी रुपाली वाघ यांनी समन्वय साधला तर त्यांना कला शिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे व नीलेश बारी यांनी सहकार्य केले.