जळगाव, प्रतिनिधी । शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सौ.सु.ग. देवकर प्रायमरी स्कूल मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती ‘बालदिन’ म्हणून साजरी करण्यात आली.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. साधना महाजन यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शाळेतील उपशिक्षक श्री.प्रशांत साखरे यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली.कार्यक्रमाला सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.