जामनेर, प्रतिनिधी । तालुक्यातील लॉन्ढ्री गावात कापसाच्या मोजणीत फसवणूक झाल्याची घटना काल दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पहूर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे.
यावेळी लॉन्ढ्री या गावातील शेतकरी नामदेव राठोड यांचा कापूस ८ हजार १०० या भावाने व्यापाऱ्यांनी खरेदी केला होता, कापूस मोजणी सुरू असताना अचानक शेतकऱ्याला शंका आली असता , कापसाचा वजन काटा असता त्याने त्या मापारी ला सांगून काटा थांबवला त्या नंतर तोच चाळीस किलो वजन केले असता, ते वजन 49 किलो भरले. त्यानंतर नामदेव राठोड यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी व्यापाराला व त्याच्या आयशर गाड्या दोन्ही थांबवून पोलिसांना कळवले असता,तात्काळ पहूर येथून पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्यासह कर्मचारी लॉन्ढ्री गावात शिरले, या वेळी पोलिसांनी मापारी आणी व्यापारी अशा दोन्ही व्यक्तीना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू केली.