पहूर येथे तालुका वकील संघ व मणियार लॉ महाविद्यालयातर्फे कायदा जनजागृती शिबीर संपन्न

0
23

जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथे येथे विधी सेवा प्राधिकरण यांचे संयुक्त विद्यमाने तालुका वकील संघ आणि एस एस मणियार लॉ कॉलेज येथील विद्यार्थी यांच्यामार्फत कायदा जनजागृती शिबिर संपन्न झाले आहे.

पहूर येथील लोकनियुक्त सरपंच निताताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एड. देवेंद्र पारळकर यांनी सूत्रसंचालन चेतन रोकडे तर आभार ॲडव्होकेट प्रशांत पाटील यांनी याप्रसंगी ॲड. एस आर पाटील, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी कायदा अंतर्गत यांनी महिला विषयी असलेल्या कायद्याची माहिती दिली. तसेच राजधर पांढरे बाबूराव घोंगडे रामेश्‍वर पाटील अंगणवाडी सेविका सुषमा चव्हाण पीडित महिला व त्यांचे अधिकार या विषयी माहिती, तर देवेंद्र पारळकर व प्रसन्न फूसे यांनी विधी सेवा प्राधिकरण याविषयी सविस्तर मार्गदर्शन करीत कार्यक्रमाचा समारोप केला प्रसंगी गावातील सरपंच ,उपसरपंच, ग्रामसेवक, व पोलिस पाटील, आशा स्वयसेविका, अंगणवाडी शिक्षिका, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, तसेच सर्व ग्रामस्थ मंडळी, तसेच ॲड. दिपाली सुरवाडे, ॲड देवेंद्र जाधव, ॲड प्रसन्न फासे, मराठी उपसरपंच श्याम सावळे रामेश्वर पाटील बाबुराव घोंगडे शिवसेना तालुका प्रवक्ता पत्रकार गणेशरावपांढरे एडवोकेट एस आर पाटील माजी सरपंच शंकर जाधव उपसरपंच राजू जाधवया कार्यक्रमाला उपस्थित होते,
एस एस मणियार विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्पना शिंदे, प्रिया शिंपी, तेजस्विनी पाटील, पूजा सांखला, संकेत राजपूत,सचिन पाटील गोविंदा जाधव कोमल काळे आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here