Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»माधवबागच्या रिसर्चला JAPI या जगप्रसिद्ध रिसर्च पेपरद्वारे मान्यता
    जळगाव

    माधवबागच्या रिसर्चला JAPI या जगप्रसिद्ध रिसर्च पेपरद्वारे मान्यता

    saimat teamBy saimat teamNovember 10, 2021No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    माधवबागच्या रिसर्चला JAPI या जगप्रसिद्ध रिसर्च पेपरद्वारे मान्यता
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगांव, प्रतिनिधी । जागतिक आरोग्य संघटने नुसार भारत हा मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जाणारा देश आहे असे समजले जाते. देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात मधुमेह पसरत चालला आहे. आज पाहिलं तर प्रत्येक घरात एकतरी मधुमेही रुग्ण हा असतोच. शिवाय एकदा का मधुमेह झाला की तो कधीच बरा होत नाही. त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी आयुष्यभर औषधं किंवा इन्सुलिन घ्यावे लागतात असा समज समाजात पसरलेला आहे. तसंच डायबेटीसमुळे हृदयरोग, हार्ट अटॅक, किडणी फेल्युअर, नजर कमजोर होणे अशा कॉम्प्लिकेशन्सना चाळीशी पुढीलच नाही तर तीस वर्षाखालील तरुण पिढी ही या गंभीर समस्यांचा सामना करत असल्याचं दिसून येत आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजेच बदललेली व चुकीची जीवनशैली आणि आजाराविषयीची असलेली अपुरी माहिती. याच अनुषंगाने डायबेटीस रिव्हर्सल विषयीचं योग्य मार्गदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माधवबागचे मुंबई येथील रिसर्च अँन्ड डेव्हलपमेंट हेड डॉ. राहुल मांडोळे, जळगांव क्लिनिक फ्रँचायझी ओनर डॉ. श्रेयस महाजन आणि क्लिनिक हेड डॉ. श्रद्धा महाजन माळी हे उपस्थित होते.

    डायबेटीसवर नियंत्रण मिळवण्यासाठी आतापर्यंत अनेक संशोधनं करण्यात आली तसंच अनेक ॲडव्हान्स ट्रिटमेंट ही आल्या पण तरीही मधुमेही रुग्णांच्या संख्येत कोणतीही घट होताना दिसून येत नाही. त्यात आयुर्वेदिक पंचकर्म व डाएटच्या मदतीने डायबेटीस रिव्हर्स होऊ शकतो असं जर सांगितलं तर आयुर्वेदा विषयी लोकांच्या मनात मोठं प्रश्नचिन्हच उभ राहतं. कारण आयुर्वेदिक ट्रिटमेंट सगळ्यांनाच सूट होते असं नाही किंवा आयुर्वेदिक ट्रिटमेंटमध्ये आजार बरा व्हायला खूप उशीर लागतो शिवाय आयुर्वेदिक पंचकर्म चालू आहे तोपर्यंत कदाचित डायबेटीस कंट्रोलमध्ये दिसेलही पण एकदा का ट्रिटमेंट थांबवली तरी डायबेटीस कंट्रोलमधेच राहील का? पुन्हा डायबेटीस होणार नाही का? अशा पद्धतीची आयुर्वेदावर नेहमी शंका दाखवली जाते. याच अनुषंगाने आयुर्वेदाविषयी असलेली शंका आणि डायबेटीस रुग्णांच्या मनात येणाऱ्या या प्रश्नांची उत्तरं म्हणून आयुर्वेदिक पंचकर्म पद्धतीने उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या माधवबागचे संस्थापक व संचालक डॉ. रोहित माधव साने, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गुरुदत्त अमीन, पेशंट एंगेजमेंट हेड डॉ. सुहास डावखर आणि रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट हेड डॉ.राहुल मंडोले यांनी सन २०१८ मध्ये एकूण ८२ टाईप २ डायबेटीस रुग्णांच्या जीवनशैलीवर संशोधन सुरु केलं. आयुर्वेदा अँड डाएटरी मॉडिफिकेशन फॉर टाईप २ डायबेटीस मॅनेजमेंट हे त्या संशोधनाचं नाव. टाईप २ डायबेटीज रुग्णांच्या जीवनशैली विषयीचा अभ्यास किंवा ते संशोधन असं होतं की, तीन महिने डाएट बॉक्स व डायबेटीस रिव्हर्सल पंचकर्म ट्रिटमेंट घेऊन जे रुग्ण जिटीटी (ग्लोकोज टॉलरन्स टेस्ट) पास झाले होते. म्हणजेच ७५ ग्रॅम साखर खाऊनसुद्धा ज्यांची शुगर नॉर्मल आली होती म्हणजेच या रुग्णांमध्ये रक्तातील साखर पचवण्याची क्षमता सामान्य म्हणजेच नॉन डायबेटीक लोकांप्रमाणे झाली होती अशा रुग्णांना वर्षभर डायबेटीसची कोणतीही ॲलोपॅथी औषधं न देता डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकावर्षाने त्यांची जिटीटी (ग्लोकोज टॉलरन्स टेस्ट ) टेस्ट करून तीन महिन्यांची ॲव्हरेज दाखवणारी गोल्ड स्टॅण्डर्ड HbA1c चाचणी करण्यात आली. या चाचणीत एक वर्षा नंतर एकूण ८२ रुग्णांपैकी ७६ रुग्णांची HbA1c चाचणी नॉर्मल आली. एकंदरीत या निरीक्षणाचा निष्कर्ष पाहता ९२% रुग्ण हे वर्षभर कोणत्याही औषधांवर नसूनसुद्धा त्यांची शुगर ही नॉर्मल आली म्हणजे ते रुग्ण नॉन डायबेटीक झालेले आहेत कारण त्यांच्यात १५ जिलेबी खाऊन जितकी साखर रक्तात निर्माण होते म्हणजेच ७५ ग्रॅम शुगर खाऊन सुद्धा सामान्य, नॉन डायबेटीक लोकांप्रमाणे शुगर पाचवण्याची क्षमता निर्माण झाली आहे असे सिद्ध झाले. याचाच अर्थ एकदा डायबेटीस रिव्हर्स झाला की तो पुन्हा होत नाही हे या संशोधनाद्वारे समोर आले. आणि याच संशोधनाला JAPI ( जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया) या जगप्रसिद्ध रिसर्च पेपरची मान्यता प्राप्त झाली व सप्टेंबर २०२१ मध्ये माधवबागचा आयुर्वेदा अँड डाएटरी मॉडिफिकेशन फॉर टाईप २ डायबेटीस मॅनेजमेंट हा रिसर्च पेपर JAPI च्या संशोधन प्रबंधामध्ये पब्लिश होऊन आला.

    याचाच अर्थ भारताला सापासारखा विळखा घालून बसलेल्या या टाईप २ डायबेटीसला रिव्हर्स करण्याची त्याला परतवून लावण्याची ताकत आयुर्वेदामध्ये आहे हे या संशोधनातून सिद्ध झालं.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : बसस्थानक आवारातून दोन तरूणांचे मोबाईल लांबविले

    December 25, 2025

    Jalgaon : एकाच दिवसात ११०० वाहनांवर कारवाई

    December 25, 2025

    Jalgaon : रायपुरला ग्रामस्थ त्रस्त, ग्रामपंचायत मस्त

    December 25, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.