जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारून काम बंद आंदोलन सुरू केले आहे, यात खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कडून होत असलेली जनतेची लुबाडणूक थांबवा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका संघटक योगेश पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे काही संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून यात काम बंद आंदोलन जवळपास आठ ते दहा दिवसापासून सुरू होते व आजपासून तर सर्व संघटनेचे काम यामध्ये सहभागी झाल्यामुळे आता एकंदरीत संपूर्ण भारतातील तसेच या बंद ठेवण्यात आल्या आहेत. ऐन दिवाळीच्या सणाला संप पुकारल्यामुळे बाहेरगावी गेल्यावर जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा मनस्ताप तसेच आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
महामंडळाच्या काम बंद आंदोलनामुळे याचा फायदा खासगी ट्रॅव्हल्स मालकांनी घेतला असून ते मनाला पटेल ते अव्वाच्या सव्वा भाडे प्रवास जवळून आ करून त्यांची एक प्रकारे आर्थिक लूटमार करीत आहे परंतु नाईलाज असल्याने प्रवाशांना संबंधित मागितले ते भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे तसेच आता विद्यार्थ्यांचे शाळा कॉलेज सुरू होणार असल्याने त्यांचा आर्थिक फटका हा शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा बसणार आहे त्यामुळे त्यांना सुद्धा गाऊन शहरात देण्यासाठी अशा प्रकारे भाडे मोजावे लागणार आहेत याबाबत खाजगी ड्रायव्हर त्यांना विचारपूस केली असता ते सांगतात की डिझेलची भाववाढ झाल्यामुळे आम्हास भाव वाढ करावी लागत आहे परंतु सद्यस्थितीत आता डिझेलचे भाव हे दहा रुपयांनी स्वस्त झाले असून सुद्धा संबंधितांकडून प्रवास भाड्यामध्ये थोडेफार सुद्धा कपात करण्यात आली नाही.
संबंधित मनमानी भाडे आकारणार या ट्रॅव्हल्स बालकांची चौकशी करून त्यांनी भाडेवाढ कमी करावी अशी सूचना आपल्या संबंधितांना देण्यात यावा व गरीब जनतेची होत असलेली आर्थिक लूटमार थांबविण्यात यावी, या बाबतचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका संघटक योगेश पाटील, महेश माळी, गोरख गायकवाड, गोविंद जाधव विशाल कुमावत आदींनी केली आहे.
