अंगणवाडी सेविका, मदतनिसांना केले सन्मानित

0
130

जळगाव ः प्रतिनिधी
एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय अंतर्गत जळगाव नागरी प्रकल्पाच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणाच्या कार्याचा जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी रफीक तडवी, बालविकास प्रकल्प अधिकारी तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी आदी उपस्थित होते.
जिल्हधिकारी राऊत म्हणाले की, समाज हेच कुटुंब समजून स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कोरोना महामारीच्या संकटात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी कौतुकास्पद कामगिरी बजावली. तसेच अंगणवाडीच्या सेवा प्रभाविपणे राबवण्याकरीता निरंतर प्रयत्न केले. जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक प्रकल्पातील एक सेविकेचा प्रतिनिधी स्वरुपात प्रमाणपत्र देऊन कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. विनोद ढगे व त्यांच्या समुहाने अंगणवाडी सेविका,सावित्रीच्या लेकी व कोरोन योद्धा व बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर पथनाट्य सादर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here