जळगाव ः प्रतिनिधी
बीएचआर पतसंस्थेत कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस आला आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ नोव्हेंबर रोजी जळगावात छापेमारी करून कागदपत्र नेले आहेत. या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले सीए महावीर जैन, विवेक ठाकरे, धरम साखला, सुजीत बाविस्कर (वाणी) व कमलाकर कोळी यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यावर आज मंगळवारी सुनावणी आहे. २२ डिसेंबर रोजी या अर्जांवर सुनावणी होती परंतु सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी खुलासा सादर करण्यासाठी वेळ मागून घेतली होती.त्यामुळे आज ५ जानेवारी रोजी सुनावणी आहे.
पुणे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात सुनावणी आहे.
सुजीत बाविस्कर, धरम साखला, महावीर जैन, विवेक ठाकरे व कमलाकर कोळी हे सर्व संशयित सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन बंदी आहेत. गुन्ह्यात संशयित कुणाल शहा याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.