मलकापूर, प्रतिनिधी । दारू पिण्यासाठी १० रूपये न दिल्याने मित्रांमध्ये झालेल्या वादातून एकाचा डोक्यात लाकडी राफ्टर मारून दोघांनी खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी तपास चक्रे फिरवित एका तासात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आज २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजे दरम्यान मुक्ताईनगर रोडवरील सरकारमान्य दारूविक्री दुकानाजवळ घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. तर पोलिसांनी या खून प्रकरणाचा तपास वेगाने तपास चव्रेâ फिरवित एका तासात आरोपींना अटक केली आहे.
शहरातील मुक्ताईनगर रोडवर सरकारमान्य दारूविक्री दुकान असून या दुकानावर भागवत सिताराम फासे (वय ५५) रा.हिंगणा काझी, विनोद लक्ष्मण वानखेडे (वय ४०), दिलीप त्र्यंबक बोदडे (वय ३५) दोघे राहणार सुभाषचंद्र बोस नगर हे तिघे मित्र त्याठिकाणी दारू पिण्यास गेले होते. यावेळी विनोद वानखेडे व दिलीप बोदडे या दोघांनी भागवत फासे यांच्याकडे दारू पिण्यासाठी १० रूपयांची मागणी केली. मात्र फासे यांनी पैसे दिले नाही. त्यानंतर फासे हे दुकानातून बाहेर आल्यानंतर वानखेडे व बोदडे या दोघांनी फासे यांनी पैसे न दिल्याचा राग डोक्यात ठेवून त्यांच्या डोक्यात लाकडी राफ्टर मारले. लाकडी राफ्टरचा वार हा जबरदस्त असल्याने भागवत फासे यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत शहर पोलिस स्टेशनला माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रल्हाद काटर हे त्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतकाची ओळख पटविली. मात्र दरम्यान आरोपी हे फरार झाले होते. खुपीया पोलिस अधिकारी भोरकडे यांच्या पथकाने तातडीने तपासचव्रेâ फिरवित दोन्ही आरोपींना पकडून पोलिस स्टेशनमध्ये आणले. पोलिसांनी आरोपींना पोलिसी खाक्या दाखविताच आरोपींनी गुन्हा कबुल केला.
याप्रकरणी शहर पोलिस स्टेशन मलकापूरला मृतकाचा मुलगा निना भागवत फासे (३०) याने दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरूध्द पोलिसांनी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
