एनसीसी भरतीसाठी आलेल्या १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

0
18
वाहन घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ

चाळीसगाव, प्रतिनिधी । भरतीसाठी आलेल्या 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी सुमारास घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील शिंदी येथील कैलास वासूदेव राठोड (वय-१८) हा तरूण एनसीसीच्या भरतीसाठी शहरातील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे कोतकर महाविद्यालयात आज आलेला होता. दरम्यान मैदानी चाचणी दरम्यान पळताना अचानक त्याला चक्कर आल्याने तो खाली पडला. त्यातच त्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी उघडकीला आली आहे. मयताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून कैलास वासूदेव राठोड याच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी धुळे येथे नेण्यात आले आहे.

दरम्यान या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here