३० टन तांदूळ साठा जप्तीप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

0
17
गोंदिया येथे जाणारा ३० टन रेशन तांदूळाचा साठा यावल पोलिसांनी पकडला

यावल प्रतिनिधी । ३० टन तांदूळ यावल पोलिसांनी पकडून ट्रक ताब्यात घेतल्याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासनाचा शिधापत्रिकेवर वितरित होणारा तांदूळ काळ्याबाजारात जास्त दराने विक्री करणारा ट्रक चोपडा-यावल मार्गे गोंदिया येथे जात असल्याची गोपनीय माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहिती २३ ऑक्टोबर रोजी दुपारी मिळाली. त्यानुसार यावल पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार मुझफ्फर खान समशेर खान, पोलीस हेडकॉन्स्टेबल असलम खान, चालक रोहिल गणेश, पोलीस कॉन्स्टेबल सुशील घुगे यांच्यासह अन्य पथक हे यावल-चोपडा रोडवर असलेल्या हॉटेल केसर बागजवळ तपासणीसाठी थांबले. दुपारी तीन वाजेच्या सुमारास तांदुळाने भरलेला ट्रक क्रमांक (एमएच १८ एसी ८४७) येताना दिसून आला. यावेळी यावल पोलिसांनी ट्रकला थांबवून तपासणी केली असता.0 त्यात ५ लाख ८८ हजार रुपये किमतीचा रेशनिंगच्या तांदूळ असल्याचे आढळून आले. यासंदर्भात ट्रक चालकाने उडवाउडवीचे उत्तर दिली. त्याची कसून चौकशी केली असता हा तांदूळ पंकज मुरलीधर वाणी रा. चोपडा यांच्या सांगण्यावरून संतोष प्रभाकर वाणी, निलेश राजेंद्र जैन रा. कापडणे ता.जि.धुळे यांच्या कापडणे येथील गोडाऊन मधून ३० टन तांदूळ भरून भंडारा येथील गितीका पराबोलिक इंडस्ट्रीज भंडारा येथे जात असल्याचे सांगितले. यासंदर्भात यावल पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन यावल पोलिसात जमा करण्यात आला आहे तर ट्रकचालक केदार मुरलीधर गुरव (वय-३८) रा. आकाश गार्डन समोर, शहादारोड, शिरपुर याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान पोलिसांनी कापडणे येथील कल्याणी विनायक इंडस्ट्रीज येथील गोडाऊनला भेट दिली असता त्या ठिकाणी शासनाचे वापरण्यात येणारे बारदान आढळून आले आतापर्यंत गेल्या दोन महिन्यात १७० टन तांदूळ काळाबाजारात विक्री केला असल्याची माहिती समोर आली आहे.

सहाय्यक फौजदार मुझफ्फर खान समशेर खान यांच्या फिर्यादीवरून पंकज मुरलीधर वाणी रा. चोपडा, निलेश राजेंद्र जैन, संतोष प्रभाकर पाटील दोन्ही रा. कापडणे ता.जि.धुळे आणि केदार मुरलिधर गुरव रा. शिरपूर जि. धुळे या चार जण विरोधात यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि. सुधीर पाटील करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here