जामनेर, प्रतिनिधी । येथील शेंदुर्णी वाडी दरवाजा भागातील एम एस सी बी ची डीपी मागील 32 ते 30 दिवसापासून बंद होती स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते आणि त्यांनीही त्यांची समस्या गावातील सर्व सर्व राजकीय पदाधिकारी स्थानिक नगरसेवक लोकप्रतिनिधी यांना सर्वांना सूचना दिली पण त्याची गोष्ट कोणीच घेतली नाही त्यांची ही समस्या त्यांनी वार्ड क्रमांक 16 चे शिवसेना शाखाप्रमुख संदीप काटोले यांना ही समस्या सांगितली समस्याचे गांभीर्य समजून संदीप कातुले यांनी शहर प्रमुख व उपतालुकाप्रमुख यांचा संपर्क केले असता त्यांनी त्यांना तातडीची भेट दिली व सामाजिक कार्यकर्ते शिवसैनिक युवराज बारी यांनी सर्व महिलांना समजावून सांगीतले, शिवसेना तुम्हाला दोन दिवसांमध्ये डीपी उपलब्ध करून देईल असे आश्वासन दिले,
व नियोजन ठरवून स्थानिक शिवसेना प्रतिनिधी ची बैठक लागली व बैठक मध्ये तातडीने सन्माननीय पालकमंत्री नामदार श्री गुलाबराव पाटील यांचा संपर्क करण्यात आला व त्यांनी आश्वासन दिलं की मी तातडीने सकाळी कोणत्याही परिस्थितीत मी डीपी पाठवतो व त्यांनी त्याचा शब्द जपून सकाळी नऊ वाजताची डीपी काढण्याचे आदेश दिले, त्याचा फॉलोअप घेत शिवसेना उपतालुका प्रमुख डॉक्टर सुनील अग्रवाल शिवसेना शहर प्रमुख भैयाभाऊ गुजर जेष्ठ शिवसैनिक युवराजभाऊ बारी ( जय हरी) सिद्धेश्वर पाटील,संदीप काटोले यांनी दिवसभर त्याचा फॉलोअप घेतला व संबंधित वायरमन संबंधित कर्मचारी यांचा संपर्क केला व आज संध्याकाळी ते डीपीचा फिट करून स्वतः उभे राहून स्वतःचा सर्व करून हात हातभार लावून डीपी एमेसिबी च्या कर्मचाऱ्यांच्या सा-यांनी फिट करण्यात आली व स्थानिक ज्या महिला त्रस्त झालेल्या होत्या त्या महिलांना परत त्यांचं बोलावून त्यांच्या हस्ते श्रीफळ फोडून डीपीचे शुभ आरंभ केले त्यावेळेस स्थानिक रहिवासी सह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते त्यावेळेस युवराज भाऊ बारी सह एकनाथ इंदलकर तुकाराम पाटील शंकर पाटील सागर ढगे भूषण दर पप्पू वाघ अशोक बारी राहुल निकम सिद्धेश्वर पाटील व स्थानिक महिला वार्ड क्रमांक 17 मधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
