जळगाव, प्रतिनिधी । सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जळगाव येथील नारीशक्ती गृप अध्यक्षा तसेच महिला पर्यावरण सखी मंच जळगाव जिल्हा कार्याध्यक्षा सौ.मनिषा किशोर पाटील यांना 17 ऑक्टोंबर रोजी इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन, खान्देश नारीशक्ती गृप, खान्देश न्यूज नेटवर्क आणि खान्देश जनसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय नारीदीप सन्मान-२०२१ गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
मनिषा पाटील यांनी समाज कार्यामध्ये स्वताला झोकून दिले असून अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून देखील त्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतात.महिला पतंजली योग समितीच्या जिल्हा प्रभारी पदाची देखील जबाबदारी त्यांच्यावर असुन जळगाव शहरात गेली अनेक वर्षे मनिषा ताई विनामुल्य योग प्रशिक्षणाचे वर्ग चालवत आहेत.गेल्या आठवड्यात मनिषा पाटील यांच्या नारीशक्ती गृप मार्फत जिल्हाधिकारींच्या हस्ते शहरातील गरीब,गरजू दिव्यांग भगिनींना शिलाई मशीन वाटप करण्यात आले होते.मनिषा ताईंच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्याप्रसंगी त्यांचा सत्कार करत असताना जळगाव शहराच्या महापौर माननीय सौ.जयश्री ताई महाजन, जळगाव शहर आमदार राजूमामा भोळे, चाळीसगाव येथील आमदार मंगेशदादा चव्हाण, धुळे येथील माजी महापौर जयश्रीताई अहिरराव, युवती सहसंयोजिका अमृता पाटील, विलास जी नेरकर माजी अध्यक्ष ग.स. सोसायटी, तुकाराम बोरोले, खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे, खान्देश जनसेवा फाऊंडेशन अध्यक्ष संदीप पाटील,ज्योतीताई राणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मनिषा ताई पाटील यांना राज्यस्तरीय नारीदीप पुरस्काराने गौरविण्यात आल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत असुन विविध संस्था संघटना यांच्याकडुन त्यांचे अभिनंदन केले जात आहे.