गोद्री येथील पतीच्या मृत्यू प्रकरणी पत्नी – प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

0
43
वाहन घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ

पहुर. ता.जामनेर, प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या गोद्री येथील एका ३४ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्या ची घटना आज सकाळी७वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

रेशमाबाई वजीर तडवी(वय६५)रा.गोद्री. ता.जामनेर यांनी पहुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की, माझा मोठा मुलगा युनुस वजीर तडवी(वय३४)याचा मृतदेह आज सकाळी ७वाजेच्या सुमारास घरासमोरील ओट्यावर आढळून आला. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे त्याची पत्नी हाजराबाई हीने सांगितले. हाजराबाई ही बाहेरख्याली वृत्ती ची असून तीचे गोद्री येथील नाना पुनमचंद नाईक(वय४०) याच्याशी अनैतिक संबंध आहे.या संबधाला कंटाळून मुलगा युनूस याने आत्महत्या केली.

याप्रकरणी पहुर पोलिस ठाण्यात पत्नी हाजराबाई तडवी व प्रियकर नाना नाईक यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here