जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर पेठ येथील संतोषी माता नगर जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची बैठकहीत नवनिर्वाचित शालेय व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली.
या बैठकीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील उपसरपंच श्याम सावळे निर्गुणा महाजन विकास लहासे प्रवीण लहासे आदी मान्यवरांची उपस्थिती होती या बैठकीत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी आत्मा समितीचे सदस्य शिवसेनेचे गटप्रमुख रमण शिरसागर यांच्याशी व्यक्त पत्नी विद्याबाई रमण शिरसागर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी उमेश दुधकर तर सदस्य म्हणून गजानन खाटीक लक्ष्मीबाई वानखेडे फिरोज तडवी वंदना जाधव लक्ष्मीबाई भडांगे विनोद चौधरी कविता साळवे दीपक पाटील वैशाली उबाळे सचिव पदी मुख्याध्यापक सुवर्णा बाई मोरे शिक्षक प्रतिनिधी म्हणून उपशिक्षिका चित्रलेखा राजपूत आदींची निवड करण्यात आली.
आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शाळेच्या हॉलमध्ये शालेय व्यवस्थापन समितीची व पालकांची बैठक संपन्न झाली या बैठकीत शाळेचे शिक्षक दिनेश गाडे उपशिक्षिका चित्रलेखा राजपूत मनीषा राऊत रत्नमाला काथार मुख्याध्यापिका सुवर्णा ताई मोरे यांच्यासह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व शालेय समितीचे संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष तथा माजी सरपंच प्रदीप लोढा शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे माजी जिल्हा सदस्य राजधर पांढरे रामेश्वर पाटील शाम सावळे आदींनी अभिनंदन केले आहे