जिल्ह्यात 16, 17 रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

0
40
भुसावळात आढळला एक नवीन रुग्ण; संख्या चारवरून पाचवर

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी 16 व 17 ऑक्टोबर, 2021 रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील शेतमालाची काढणी करावी व शेतात साठवणूक केलेला शेतमाल सुस्थितीत योग्य ठिकाणी ठेवावा. जेणेकरुन वरील कालावधीत होणाऱ्या वादळी वारा, अवकाळी पावसापासून शेतमालाचे संरक्षण करणे सोयीचे होईल, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here