Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»अर्थ»745 crores diverted for Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय, आदिवासी विकास खात्याचे ७४५ कोटी वळवले ; संजय शिरसाट संतापले
    अर्थ

    745 crores diverted for Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय, आदिवासी विकास खात्याचे ७४५ कोटी वळवले ; संजय शिरसाट संतापले

    Vikas PatilBy Vikas PatilMay 3, 2025No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय, आदिवासी विकास खात्याचे ७४५ कोटी वळवले ; संजय शिरसाट संतापले

    मुंबई (प्रतिनिधी)-

    महायुती सरकारची लाडकी बहीण योजनेला निधी मिळवताना दमछाक होत आहे. दोन कोटी लाभार्थींना दरमहा आर्थिक मदत देण्यासाठी सरकारला इतर खात्यांचा निधी वळवावा लागत आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आला आहे. दोन्ही विभागांचे अनुक्रमे 410 कोटी 30 लाख आणि 335 कोटी 70 लाख रुपये महिला आणि बालविकास विभागाकडे वळविण्यात आले. काल हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयानंतर सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आल्याने मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला आहे.

    निधी वळवल्याच्या प्रश्नावर संजय शिरसाट म्हणाले, तुमच्या माध्यमातून कळले सव्वाचारशे कोटी वर्ग करण्यात आले आहेत, याची मला कल्पना आणि माहिती नाही. सामाजिक न्याय खात्याची आवश्यकता नसेल तर खातं बंद केले तरी चालेल, असं म्हणत शिरसाटांनी संताप व्यक्त केला आहे.

    मला याची काहीच कल्पना नाही, मी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करेल, फायनान्स डिपार्टमेंट मनमानी चालवत आहे, आपण म्हणू तेच खरं म्हणत आहेत. या खात्याचा कायदेशीर निधी वर्ग करता येत नाही , कट करता येत नाही, फायनान्स डिपार्टमेंटवाले आपले डोके जास्त चालवत असतील तर हे बरोबर नाही, हे स्पष्टपणे सांगतो. आदिवासी समाज कल्याण खाते कशासाठी निर्माण झालं आहे? इतर खात्यातून पैसे वर्ग करता येत नाहीत का? हे मला पटलेलं नाही, माझे मागचे वर्षीचे दायित्व 1500 कोटी रुपयांचे आहे. इतर खात्याचे वर्ग झाले की काय माहिती नाही. मात्र, सामाजिक खात्याचे पैसे वर्ग झाले हे सत्य आहे, असं म्हणत खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला आहे.

    संजय शिरसाट म्हणाले, माझ्या खात्याचा निधी तुम्हाला इतर ठिकाणी वर्ग करता येत नाही, हा नियम आहे. फायनान्समध्ये काही जण बसले आहेत, त्यांना आपण हुशार आहोत असं वाटत असेल तर त्यांनी मला हे दाखवलं पाहिजे, नियम द्या मला निधी वर्ग करता येतो म्हणून करता येत असेल तर मी त्यांची माफी मागेन, लाडकी बहिण लाडकी आहे, फायनान्समध्ये बसलेले शकुनी आहेत, त्यांनी केलेले हे काम आहे, असं म्हणत संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला आहे.

    शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निधी वळवल्याच्या निर्णयावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. “लाडक्या बहिणीचा हफ्ता भरायला सरकारने आदिवासींच्या वाट्याचे पैसे पळवले! सरकारी तिजोरी कोरडी होत चालली आहे! सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी मंजूर 3,960 कोटींपैकी 410 कोटी 30 लाख रु. तसेच आदिवासी विकास खात्याला दिलेल्या 3,420 कोटींच्या सहाय्यक अनुदानातून 335 कोटी 70 लाख रुपये लाडकी बहिण योजनेसाठी खेचले! आदिवासी विभागाच्या वाट्याचे एकूण 746 कोटी रुपये पैसे सरकारने खेचून नेले! नियोजन आयोगाच्या नियमानुसार, आदिवासी आणि सामाजिक न्याय या दोन खात्यांना दिला जाणारा निधी त्या समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ठरतो. हा निधी त्या संवर्गावरच खर्च करणे बंधनकारक असते तो इतर खात्यांमध्ये वळवता येत नाही”, अशी पोस्ट शेअर करत निधी वळवता येत नाही असं सांगत नियम देखील दानवेंनी आपल्या पोस्टमध्ये सांगितला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Mumbai : “महिलांचे राज्य! महाराष्ट्रातील १५ महानगरपालिकांमध्ये महिला महापौर

    January 22, 2026

    Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील शाळांसाठी १२ कोटींचा क्रीडांगण विकास निधी मंजूर

    January 22, 2026

    Erandol (Kasoda) : ‘ऑपरेशन मुस्कान’ला यश: कासोदा पोलिसांनी २४ तासांत शोधली बेपत्ता १५ वर्षीय मुलगी

    January 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.