Anubhuti Residential School : अनुभूती निवासी स्कूलचा सलग १८ व्यावर्षी १०० टक्के निकाल 

0
27

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १८ व्यावर्षी १०० टक्के निकाल 

जळगाव (प्रतिनिधी )–

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनिशन्स (सीआयएससीई) चा दहावी व बारावी निकाल जाहिर झाले. अनुभूती निवासी स्कूलच्या स्थापनेपासून (२००७ पासून) आतापर्यंत १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीसुद्धा कायम राहिली आहे. इयत्ता १२ वीत क्रिषा राठोड तर दहावीत वेद भुसकाडे प्रथम आले आहेत.

क्रिषा राठोड ९५टक्के गुणांसह पहिली आली आहे. आरोही परांजपे ९३.२५ टक्के गुणांसह द्वितीय तर शाल्मली अलमन ९२.२५ तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. ९० टक्यांच्यावर ६ तर ८० ते ९० टक्क्यांमध्ये तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

आयसीएसई (दहावी) मध्ये प्रथम आलेला वेद भुसकाडे याला ९६.८० टक्के गुण प्राप्त झाले आहे. त्याला रोबोटिक आणि एआयमध्ये शंभरपैकी शंभर गुण मिळाले. दिग्विजय मोरे यांने ९५.४० टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळविला. त्याने इंग्रजी साहित्य विषयात शंभरपैकी शंभर गुण प्राप्त केले अनुष्का महाजन हिला ९४.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने ती उत्तीर्ण झाली. जयेश केडीया या विद्यार्थ्यांनी इतिहास विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळविले आहे. ९० टक्क्यांच्यावर ९ विद्यार्थी तर ८० ते ९० टक्क्यांदरम्यान १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

अनुभूती निवासी स्कूल अनुभवाधारीत शिक्षण देणारी स्कूल आहे. सीआयसीएसई पॅटर्नची कान्हदेशातील पहिलीच शाळा आहे. छंद जोपासत वर्षभर होणाऱ्या विविध स्पर्धा, उपक्रमांमध्ये कौशल्य दाखवित विद्यार्थीही यश संपादित करतात.
भविष्याचे वेध घेत शैक्षणिक अभ्यासक्रमासह सूप्त कलागुणांना जोपासून विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या आधारे प्राप्त केलेले यश गौरवास्पद आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंद, शिक्षकतेतर कर्मचारी व पालकांचेही अभिनंदन होत आहे.

अनुभूती स्कूलचे संचालक मंडळ, अशोक जैन, अतुल जैन, निशा जैन, प्राचार्य देबासिस दास यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले आहे.भवरलालजी जैन यांच्या विचारांवर आधारित शैक्षणिक मूल्य जपणाऱ्या अनुभूती निवासी स्कूलच्या स्थापनेपासून विद्यार्थ्यांनी यंदाही १०० टक्के निकाल राखला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here