Adv. Mahesh Dhake awarded : ॲड. महेश ढाके यांना पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान

0
22

ॲड. महेश ढाके यांना पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान

पुणे (प्रतिनिधी ) –

कायदा आणि ग्राहक संरक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ॲड. महेश निळकंठ ढाके यांना पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई प्रतिष्ठान, उरुळी कांचन, पुणे व राष्ट्र सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, पुणे येथे झालेल्या समारंभात नुकताच प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भोळे होते. सनराईझ इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड, मुंबईचे मॅनेजिंग डायरेक्टर एन. व्ही. चौधरी, भातृ मंडळ, पुणेचे सल्लागार कृष्णा खडसे, ज्येष्ठ साहित्यिक मुरलीधर पाटील उपस्थित होते. ॲड. ढाके यांनी गेली दोन दशके ग्राहक हक्क, कायदा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे कार्यक्रमाला महाराष्ट्रातून अनेक मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here