success in Sanskrit exams : चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयाचे संस्कृत परीक्षांमध्ये यश

0
27

चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयाचे संस्कृत परीक्षांमध्ये यश

रावेर (प्रतिनिधी) –

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापिठाच्या २०२४- २५ मधील परीक्षेतील प्राज्ञ, विशारद, शास्त्री या वर्षाचे निकाल जाहीर झाले आहे. फैज़पुर येथील श्री चक्रधर गुरुकुल विद्याप्रसारक मंडल संचालित श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयाचा निकाल ८० टक्के लागला आहे. २०२४- २५ या वर्षात ११५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

प्राज्ञमध्ये शिकत असलेला विद्यार्थी कन्हया कोठी व विशारदमध्ये शीतल भोजने व शास्त्रीमध्ये निकिता वायंदेशकर यांनी विशेष प्राविण्य मिळवत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे श्रीचक्रधर गुरुकुल विद्याप्रसारक मंडलाच्या वतीने अध्यक्ष वसंत विश्वनाथ महाजन यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

संस्कृत ही भाषा केवळ शैक्षणिक विषय नाही तर ती भारतीय तत्त्वज्ञान, धर्म, आणि साहित्य यांचे मूळ आहे. म्हणूनच अशा पदवीधारकांची समाजात भूमिका फार महत्त्वाची ठरते.

संस्कृत अभ्यासक म्हणून आपल्या कार्यातून ते भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतील, अशी अपेक्षा चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य गौरव संतराज आराध्य यांनी व्यक्त केली. या वर्षी १० जणांनी संस्कृत शास्त्री ही पदवी प्राप्त केली.

संस्कृत शास्त्रातील पदवी हा प्राचीन भारतीय विद्या विषयांचा अभ्यास असून, यात वेद, उपनिषद, शास्त्र, इतिहास, आणि भाषाविज्ञान आदींचा समावेश होतो. या पदवीमार्फत प्राचार्य गौरव आराध्य, प्रा.गोविंद आराध्य, प्रा.सोनाली नागापुरकर, लिपिक प्रदीपराज पंजाबी, प्रा.शैलेशमुनी महानुभाव व वसतीगृह व्यवस्थापक सदानंद मुनी मराठे यानी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here