Revenge : डोक्यात गोळ्या झाडून वडीलांच्या हत्येचा सूड ! 

0
35

डोक्यात गोळ्या झाडून वडीलांच्या हत्येचा सूड ! 

जळगाव (प्रतिनिधी) –

धरणगाव तालुक्यातील वाकटुकी येथे २२ एप्रिल रोजी रात्री तरुणावर बेछूट गोळीबार करीत त्याची हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, ही घटना १५ वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा बदला म्हणून घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

गोपाळ सोमा मालचे (वय ४०, रा. वाकटुकी ता.धरणगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो वाकटुकी गावात परिवारासह राहत होता. सन २०१० साली खूनाचा गुन्हा गोपाळ मालचे याच्यावर दाखल झाला होता.हा खटला न्यायप्रविष्ठ आहे. २२ एप्रिलरोजी संशयित आरोपी राहुल सावंत (कोळी) हा गोपाळ मालचे याच्यावर दबा धरून बसला होता. त्याचे वडील ज्ञानेश्वर कोळी यांचा २०१० साली खून झाला होता तो खून गोपाळ मालचे यांनी केल्याचे त्याचे म्हणणे आहे.

रात्री ८ वाजता वाकटुकी फाट्याजवळ गोपाळ मालचे आले असता त्यांच्यावर राहुल सावंत याने गावठी पिस्तुलातून चार वेळेस गोळीबार करीत हत्या केली. थेट डोक्यामध्ये गोळी शिरल्याची माहिती आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गोळीबारानंतर संशयित राहुल सावंत कोळी स्वतः धरणगाव पोलीस स्टेशनला हजर झाला. पोलिसांनी घटनास्थळी माहिती घेतली आहे गुन्हा दाखल करण्याचे काम धरणगाव पोलीस स्टेशनला सुरू आहे. मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्याचे काम सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here