पहलगाममध्ये देवयानी ठाकरेंसह चाळीसगावमधील पर्यटक अडकले
जळगाव (प्रतिनिधी)-
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निरपरांधाचा बळी गेला. चाळीसगाव येथील भाजपच्या देवयानी ठाकरे 14 जणांसह व जळगावातील शिव कॉलनीतील नेहा वाघुळदे मैत्रिणींच्या ग्रुपसोबत पहलगाममध्ये अडकल्या आहेत.
चाळीसगाव येथील भाजपच्या देवयानी ठाकरे भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष असून त्या त्यांचे पती व सहकाऱ्यांसोबत काश्मीरला गेल्या होत्या. सध्या त्या श्रीनगरमध्ये सुरक्षित ठिकाणी असल्याचं परिवाराकडून सांगण्यात आलं संपूर्ण काश्मीरमध्ये हाय अलर्टजारी करण्यात आला आहे. देवयानी ठाकरे सहकाऱ्यांसोबत महाराष्ट्रात परतणार आहेत.
जळगावच्या खासदार स्मिता वाघ तसेच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे त्यांच्या संपर्कात आहेत. 25 तारखेचे त्यांचे विमानाचे तिकीट बुक झालेले आहे.
जळगावातील शिव कॉलनीतील नेहा वाघुळदे पहलगाम मध्ये अडकल्या आहेत. त्या 16 तारखेपासून मैत्रिणींच्या ग्रुपसोबत गेल्या होत्या. नेहा वाघुळदे यांचं त्यांचे पती तुषार वाघुळदे यांच्यासोबत फोनवर बोलणं झालं होतं. याच परिसरात नेहा वाघुळदे फिरून आल्यानंतर लॉजवर आल्या. तेथे त्या थांबल्या असताना दुसरीकडे दहशतवाद्यांनी हल्ला केला, अस नेहा यांनी सांगितल्याचं तुषार यांनी नमूद केलं. पत्नीशी बोलणं झालं त्यावेळी त्यांना सैन्य दलाने सुरक्षित स्थळे हलवल्याची माहिती दिली. व्हॉट्सॲप मेसेजद्वारे त्या संवाद साधत असल्याचं तुषार यांनी नमूद केलं. 28 रोजी नेहा वाघुळदे तसेच त्यांचा ग्रुप जळगावला परतणार आहे.