जळगाव, प्रतिनिधी । मेहरून बालविकास प्रेरणा केंद्र सामाजिक व शैक्षणिक संस्था जळगाव व आधार हाउसिंग फायनान्सच्या व Y4D फाउंडेशनच्यावतीने दिनांक 6 रोजी मेहरुण येथील हनुमान नगर येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधी वितरण शिबिर राबविण्यात आले.
सकाळी 9 वाजेपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत शिबिरामध्ये 200 रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधी वितरण करण्यात आले. मेहरून बाल विकास प्रेरणा केंद्र या संस्थेचे अध्यक्ष समाधान पवार व उपस्थित डॉक्टर मृण्मयी चौधरी तसेच फार्मसिस्ट धीरजकुमार राठोड तसेच रजिस्ट्रेशनला आनंद पवार, निलेश चौधरी, मनोज शिंपी, ललित कोळी, गणेश शिंपी, चेतन परदेशी, दीपक घ्यार, अनिल पवार, मनोज मराठे, सागर सोनवणे आदी उपस्थित होते.