मालकाचा विश्वासघात; कंपनीतून ३ लाखांचा कच्चा माल लंपास
जळगाव (प्रतिनिधी) :
तालुक्यातील नशिराबाद येथील सुबोनिया केमिकल्स कंपनीत मालकाचा विश्वासघात करून कर्मचाऱ्यांनी ३ लाख रुपयांचा ऑरगॅनिक कच्चा माल चोरून नेला म्हणून नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
सुयोग सुधाकर चौधरी (वय ४८, रा. एमआयडीसी, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची नशिराबाद शिवारामध्ये सुबोनिया केमिकल्स कंपनी आहे. या कंपनीमध्ये अमित कमलाकर बेंडाळे (रा. सांगवी ता. यावल) आणि विरेंद्र खुबलाल विश्वकर्मा (रा. खडका ता. भुसावळ) काम करीत होते. त्यांनी १ ऑगस्ट २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ दरम्यान कंपनीत काम करताना कच्चामाल चोरून नेला. सुयोग चौधरी यांनी ११ एप्रिल रोजी फिर्याद दिली गुन्हा दाखल करण्यात आला.