Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»वक्फ विधेयकाला नव्हे; अफरातफरीला विरोध- उध्दव ठाकरे
    मुंबई

    वक्फ विधेयकाला नव्हे; अफरातफरीला विरोध- उध्दव ठाकरे

    Vikas PatilBy Vikas PatilApril 3, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वक्फ विधेयकाला नव्हे; अफरातफरीला विरोध- उध्दव ठाकरे

    मुंबई (प्रतिनिधी)–

    वक्फ सुधारणा विधेयक मुस्लिमांच्या हिताचे आहे तर हिंदुत्व आम्ही सोडले की तुम्ही सोडले? उद्या हिंदू देवस्थानावर गैरहिंदू लादला तर ते आम्ही सहन करू का? वक्फ बोर्डावर गैरमुस्लिम ते कसे सहन करतील. वक्फ बोर्डात अफरातफर सुरू असेल तर नक्कीच पायबंद घातला पाहिजे. विकास, रोजीरोटी बाजूला ठेवून हिंदू-मुस्लिम केले जात आहे. आम्ही हिंदुत्व सोडले असे काही बाटगे म्हणतात मग तुमच्या आजूबाजूला मुस्लिमांचे कौतुक होत होते तेव्हा तुम्ही का गप्प बसला? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी शिंदेसेना आणि भाजपावर हल्लाबोल केला आहे.

    वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत पारित झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांनी कधीही सगळे मुस्लिम देशद्रोही आहेत असे म्हटले नाही. आजही आमच्याकडे शाबीरभाई शेखसारखे कडवट मुस्लिम कार्यकर्ते आहेत. हिंदुत्ववादी असाल तर भाजपाने त्यांच्या झेंड्यावरील हिरवा रंग काढावा. फटाक्यांची वात पेटवायची आणि पळून जायचे ही भाजपाची वृत्ती आहे. त्याला आम्ही विरोध केला. वक्फच्या जमिनी बळकावून त्यांच्या व्यापारी मित्रांना दिल्या जाणार त्याचा आम्ही विरोध केला आहे असे त्यांनी म्हटले. वक्फ सुधारणा विधेयकात ज्या दुरुस्त्या सुचवल्या त्यावरून तुम्ही मुस्लिमधार्जिणे आहात असे दाखवले जात होते. भाजपाचे नेते अमित शहा, किरेन रिजिजू, टीडीपी, जेडीयू यांनी भूमिका मांडली की, गरीब मुस्लिमांसाठी हे विधेयक आणले. मराठीत त्याला लांगुलचालन म्हणतात तेच तुम्ही करत होता. तोडा, फोडा आणि राज्य करा हे भाजपाचे धोरण आहे. आम्ही हिंदुत्व सोडले असे बोलले जाते, वक्फ सुधारणा विधेयकाचे हिंदुत्वाशी काय देणेघेणे? मुस्लिमांवर बोलायचे, सौगात-ए-मोदी वाटायचे हे केले जाते. जे चुकीचे आहे ते चुकीचे आहे. त्याचे समर्थन आम्ही करणार नाही. वक्फ बोर्डाच्या जमिनीवर भाजपाची नजर आहे. आज मुस्लिमांवर जसे केले तर हिंदूंवरही होणार आहे. केवळ जमिनीसाठी हे विधेयक आणले. आम्ही विधेयकाला विरोध केला नाही तर भ्रष्टाचाराला केला असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

    देशाच्या हितासाठी जे आवश्यक आहे त्यावर बोलायला हवे होते. अमेरिकेने भारतावर जो टॅरिफ लावला आहे त्यावर संसदेत चर्चा व्हायला हवी होती. अमेरिकेने जे धोरण राबवले त्यावर भारताची भूमिका काय हे स्पष्ट व्हायला हवे. अमेरिकेने जो टॅक्स लावला तो हिंदू-मुस्लिमांवर लावला नाही. हे टॅरिफ देशावर लावले आहे. त्यामुळे यावर संसदेत चर्चा व्हायला हवी, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली. जिनालाही लाजवेल अशी भाषणे भाजपा नेत्यांनी संसदेत केली. रामनवमी, हनुमान जयंतीला गरीब हिंदूंना काही वाटले का, मुसलमानांना सौगात-ए-मोदी वाटली जाते. मुस्लिमांची बाजू भाजपा घेतेय त्यामुळे हिंदूंनी जागे व्हायला हवे असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026

    Metro accident : मुलुंड मेट्रो अपघात मुख्यमंत्र्यांकडून चौकशी आणि ५ लाखांची मदत जाहीर

    February 14, 2026

    Mumbai-Pune : मुंबई–पुणे एक्स्प्रेस वेची २२ तासांची जॅम

    February 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.