तोतया टीसी लोहमार्ग पोलिसांनी पकडला

0
70

तोतया टीसी लोहमार्ग पोलिसांनी पकडला

भुसावळ (प्रतिनिधी)-

गोरखपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या सतर्कतेमुळे एस ८ कोचमध्ये नकली तिकीट तपासनीस असल्याचे उघड झाले. रेल्वे अधिकाऱ्यांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आणि गुन्हा दाखल करण्यासाठी भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे सोपवले.

भोपाळ विभागाचे डीवाय सीटीआय मनोज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ मार्चरोजी नियमित तपासणी दरम्यान एस ८ कोचमध्ये प्रफुल गजभिये नावाची व्यक्ती तिकीट तपासणी करत असल्याचे आढळले. अधिकृत ओळखपत्र त्याच्याकडे आढळले नाही. प्रवाशांनी सतर्कता दाखवत खंडवा ते नेपानगर दरम्यान हा नकली टीसी असल्याचे ओळखले आणि रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती दिली. नंतर रेल्वे प्रशासनाने कारवाई करत भुसावळ रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांना माहिती कळवली.

भुसावळ रेल्वे कंट्रोलला एस आठ कोचमध्ये नकली टीसी फिरत असल्याची माहिती आधीच मिळाली होती. त्यामुळे गाडी दुपारी अडीचदरम्यान भुसावळ स्थानकावर पोहोचताच, रेल्वे सुरक्षा सहाय्यक निरीक्षक एन. के. सिंग आणि कॉन्स्टेबल नितेश कुशवाह तसेच भुसावळ लोहमार्ग पोलिसांचे कॉन्स्टेबल संजय जोशी यांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या प्रफुल गजभिये या संशयित आरोपीची भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात चौकशी सुरू असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here