लाचखोर सहायक अभियंत्यास अटक

0
40

लाचखोर सहायक अभियंत्यास अटक

चोपडा (प्रतिनिधी) –

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव युनिटने सापळा कारवाईत सहायक अभियंता अमित सुलक्षणे (वय 35) याला लाच घेताना रंगेहात पकडले असल्याने खळबळ उडाली आहे.

चोपडा शहरात आरोपी अमित सुलक्षणे महावितरण कंपनी चोपडा शहर कक्षा 2 मध्ये सहायक अभियंता आहे. त्याने 23 वर्षीय तक्रारदाराच्या घरात नवीन वीज मीटर बसवण्यासाठी 5,500 रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती 4,500 रुपये ठरवण्यात आले. आज त्याला ही लाच स्वीकारताना पकडण्यात आले.

काल तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार नोंदवली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, 12 मार्च रोजी सापळा रचून आरोपीला लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. या कारवाईनंतर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

सापळा आणि तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव यांनी जबाबदारी सांभाळली. सापळा पथकात पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पो. कॉ. प्रणेश ठाकूर, पो. ना. मराठे आणि पो. ना. राकेश दुसाने यांचा समावेश होता. आरोपीचे सक्षम अधिकारी म्हणून मुख्य अभियंता, महावितरण कंपनी यांच्याकडे कारवाईसाठी अहवाल सादर करण्यात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here