Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»घरी बसून गंगेचे पाणी अस्वच्छ म्हणणे चुकीचे – आमदार राम कदम
    मुंबई

    घरी बसून गंगेचे पाणी अस्वच्छ म्हणणे चुकीचे – आमदार राम कदम

    Vikas PatilBy Vikas PatilMarch 9, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    घरी बसून गंगेचे पाणी अस्वच्छ
    म्हणणे चुकीचे – आमदार राम कदम

    मुंबई (प्रतिनिधी)-

    मी कुटुंबासोबत तीन वेळेस कुंभमेळ्यात पवित्र स्नान केलं आहे. अनेक नेते, अभिनेते, उद्योगपती, साधू-संत सगळेच लोक पवित्र स्नानासाठी गेले. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की, देशभरातील 57 कोटी लोक संगमावर आले. तिथले पाणी स्वच्छ होते. त्यामुळे जे गेलेच नसतील त्यांनी घरी बसून पाणी अस्वच्छ असे म्हणणे चुकीचे आहे. त्या 57 कोटी लोकांच्या श्रद्धेवर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात, असा पलटवार भाजप आमदार राम कदम यांनी राज ठाकरे यांच्यावर केलाय.

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 19 वा वर्धापन दिन सोहळा आज चिंचवडमधल्या रामकृष्ण मोरे सभागृहात सोहळा पार पडला. या सोहळ्यात राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील स्नानाची खिल्ली उडवली. राजीव गांधी असल्यापासून गंगा स्वच्छ होणार हे ऐकत आहे. त्यानंतर राज कपूर यांनी चित्रपट देखील काढला, लोकांना वाटलं गंगा साफ झाली. पण त्यात वेगळी गंगा होती. लोक म्हणाले अशी गंगा साफ असेल तर आम्हीही आंघोळ करायला तयार आहोत. पण गंगा साफ व्हायला तयार नाही. या सगळ्या श्रद्धा, अंधश्रद्धेतून बाहेर पडा. आपली डोकी नीट हलवा, असे त्यांनी म्हटले. बाळा नांदगावकर यांनी आपल्यासाठी तेथील पाणी आणलं असता ते पाणी पिण्यास नकार दिल्याचा खुलासा देखील त्यांनी केला.

    आता यावरून भाजपने राज ठाकरेंवर पलटवार केलाय. राम कदम पुढे म्हणाले की, मोदी सरकार नद्या स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत आहे. गंगा नदीत आतापर्यंत लाखो फॅक्टरी आणि गटारांचे आऊटलेट्स होते. आता बऱ्यापैकी ते कमी करत आणले आहे. अजून देखील काही काम करावे लागणार आहे. नद्या स्वच्छ झाल्या पाहिजे हा एक भाग आहे. पण, संगमाचे पवित्र स्नान हा पूर्णपणे श्रद्धेचा भाग आहे. त्याच्यामुळे यावर आरोप-प्रत्यारोप करण्यापूर्वी सनातन हिंदू धर्माच्या श्रद्धेचा सन्मान सर्वांनीच केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

    राज ठाकरे म्हणाले की, नुकतीच कोरोना महामारी होऊन गेली आहे. दोन वर्ष तोंडाला कापड लावून आपण फिरलो आणि तिकडे जाऊन कुंभमेळ्यात अंघोळ करत आहोत. कुणालाही कुणाचे देणेघेणे नाही. आजवर मी कित्येक स्विमिंग पुलांच्या उद्घाटनाचे कार्यक्रम केले. सुरुवातीला ते निळे होते, मात्र कालांतराने ते स्विमिंग पूल हिरवे होत गेले. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही? एक नदी या देशातील स्वच्छ नाही. परदेशात ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस तिथल्या नद्या पाहतो तर त्या एकदम स्वच्छ असतात. आपण आपल्या इथे नद्यांना माता म्हणतो मात्र परदेशात असं होत नाही. तरीही त्या नद्या स्वच्छ आहेत. मात्र इथल्या नद्यांमध्ये सर्व प्रदूषित पाणी सोडले जाते, असे त्यांनी यावेळी म्हटले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026

    Metro accident : मुलुंड मेट्रो अपघात मुख्यमंत्र्यांकडून चौकशी आणि ५ लाखांची मदत जाहीर

    February 14, 2026

    Mumbai-Pune : मुंबई–पुणे एक्स्प्रेस वेची २२ तासांची जॅम

    February 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.