तिसऱ्या बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनाचे
१० मार्चला अमळनेरात आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) –
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने तिसरे बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलन सोमवार १० मार्चरोजी अमळनेरच्या प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात होणार आहे. या संमेलनात १५० विद्यार्थी साहित्यिक सहभागी होतील.
अमळनेर येथे विद्यापीठाचे प्रताप तत्त्वज्ञान केंद्र असून १० मार्चरोजी एक दिवसाचे हे विद्यार्थी साहित्य संमेलन होणार आहे. म्हसदी येथील स्व. आर. डी. देवरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव गिरासे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी स्वागताध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, कार्याध्यक्ष ॲङ. अमोल पाटील, नितीन झाल्टे, प्रा. शिवाजी पाटील हजर राहणार आहेत.
या संमेलनात विद्यार्थ्यांचे स्वलिखित काव्यवाचन स्पर्धा, कथाकथन, परिसंवाद, बोलीभाषा स्पर्धा होणार आहेत. संमेलनाचा समारोप सायंकाळी कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी दिली.