जळगाव, प्रतिनिधी । सध्या सर्वत्र गाण्यांचा ट्रेंड सुरू आहे. तरूणांपासुन ते वयस्कर लोकांना पर्यंत सर्वांनाचा गाण्याचे वेड आहे. गाण्यामुळे मन प्रसन्न होत असते यामुळे आज संगीत हे मन प्रसन्न करणारे एक चांगले माध्यम आहे.यातच जून्या गाण्यांना नवीन रूपात मांडणी करून आकर्षीत करण्याचे काम सध्या इंडस्ट्रीमध्ये सुरू आहे. असेच एक गाणे ‘मेरा दिल भी कितना पागल है’ जळगावच्या एका सिव्हील इंजिनिअर झालेल्या तरूणाने तयार केले असून त्याला सोशल मिडीयावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जळगाव येथील मोहाडी परीसरातील रहिवासी माही सुर्वे या 25 वर्षीय तरूणाने हे गाणे तयार केले असून त्याला नुकतेच यु टयुब वर प्रदर्शीत केले आहे. गाण्याची उत्तम मांडणी करण्यात आली असून याची शुटींग अलिबाग येथे करण्यात आली आहे. ओल्ड ईज गोल्ड असे म्हणतात यामुळे साजन सिनेमातील ‘मेरा दिल भी कितना पागल है’ या गाण्याला नवीन रूपात सादर करून चाहत्यांची दाद या तरूणाने मिळवीली आहे. अमय जोशी यांनी या गाण्याला डिरेक्ट केले आहे. शाळेत असतांनाच संगीताची आवड असलेल्या माहीने गेल्या पाच वर्षापासुन आपले पाऊल या इंडस्ट्रीत रोवले, नसुते रोवलेच नाही तर यात यशस्वी देखिल झाला आहे. आता पर्यंत पाच गाणे प्रदर्शित करण्यात आले असुन यात माझा पिल्लु, साथ तुझा, मेरा दिल भी, आय एम ईन लव्ह, तु पुन्हा भेट या गाण्यांचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत 50 हजारावर लाईक्स या गाण्यांना मिळाले आहेत. माहीच्या टीम मध्ये त्याचे मित्र काम करीत असुन तर ॲक्ट्रेस म्हणून महिमा नागमोती यांनी अभिनय केला आहे. माहिचे वडील जिल्हा परीषदेतून रिटायर झाले आहेत. मुलाची संगीतातील आव्ाड पाहून ते देखिल त्याला यासाठी प्रोत्साहन देत असतात. आता माहीने संगीत क्षेत्रात करीअर करण्याचा निर्णय घेतला आहे. करीअर बद्दल विचारणा केली असता त्याने सांगीतले की, आपल्या अंगी असलेले गुण लोकांपुढे सादर करण्याचे उत्तर साधन म्हणजे सोशल मिडीया आहे. यासाठी जास्त खर्च देखिल येत नाही. या माध्यमातून आपन जगभर लोकांच्य संपर्कात येत असतो. यातूनच आपल्या अंगी असलेल्या कलागुणांची पारख होते. माहीने तयार केलेली ही गाणे लवकरच झी म्युझिक आणि झी मराठी वाहीनीवर प्रसारीत केले जाणार असल्याचेही त्याने ‘दैनिक साईमत’शी बोलतांना सांगीतले. माहीचे सदर गाणे यु टयुबवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावर ते आपल्याला पहावयास मिळणार आहे. जळगावच्या तरूणाने संगीत क्षेत्रात केलेली उत्तम कामगिरी जळगावचे नाव उच्चाविण्यास मदत होणार आहे.