महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन

0
55

जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संंघांचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार संंघ व श्री राजपूत करणी सेना, खान्देश विभाग यांंच्या संयुक्त विद्यमाने उद्या दि.१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १० वाजता येथील कांंताई सभागृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचा ठराव पद्मालय विश्राम गृह येथे आयोजित महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या बैठकीत करण्यात आला आहे.
सद्यस्थितीत राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याने राज्यशासनाने मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे अवाहन केले आहे. या अवाहनाला प्रतिसाद देत पत्रकार संघाने प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त राज्यभर रक्तदान शिबिरं आयोजित केले आहे. यावेळी कार्यक्रमास्थळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची सदस्य नोंदणी देखील केली जाणार आहे.
तरी पत्रकार संघांचे व श्री राजपूत करणी सेनेच्या पदाधिकारी, सभासद,हितचिंतक यांनी या शिबिरात रक्तदान करावे असे आवाहन पत्रकार संंघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे, श्री राजपूत करणी सेनेचे खान्देश विभाग अध्यक्ष प्रविणसिंग पाटील, पत्रकार संघांचे खान्देश विभाग
प्रमुख किशोर रायसाकडा,खान्देश विभाग उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गायके, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष डिगंबर महाले,जिल्हा कार्याध्यक्ष शरद कुलकर्णी,उत्तर महाराष्ट्र संंपर्क प्रमुख मिलिंद लोखंडे, वृत्त वाहिनी
विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील,कार्याध्यक्ष संतोष ढिवरे, जिल्हा संघटक भगवान मराठे,ग्रामीण कार्याध्यक्ष दीपक सपकाळे,महिला जिल्हाध्यक्षा नाजनीन शेख,महानगराध्यक्ष कमलेश देवरे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोळे, संजय तांबे, मुकेश जोशी जिल्ह्या सहसंघटक चेतन निंबोळकर,महानगर कार्याध्यक्ष रितेश माळी, भूषण महाजन, गोपाळ सोनवणे, जळगाव तालुकाध्यक्ष स्वप्नील सोनवणे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here