राज्यात आजपासून शाळेची घंटा वाजणार; विद्यार्थ्यांचा किलबिलाट पुन्हा सुरू

0
10

पुणे, वृत्तसंस्था । करोनाच्या प्रादुर्भावामुळे दीड वर्ष शाळा बंद होत्या. आता प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याने शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यात आल्या आहे. शाळांमधील किलबिलाट पुन्हा सुरू झाला आहे.

गुलाब पुष्प, चॉकलेट देवून व औक्षण करून विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. राज्य शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करताना शाळांना मोठी कसरतच करावी लागत आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता यांना प्राधान्य देत आज शाळेची पहिली घंटा वाजली.

शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची एंट्री होताच आधी त्यांचे तपमान व ऑक्सिजन लेव्हल तपासण्यात आली. त्याच्या नोंदी रजिस्टरमध्ये करण्यात आल्या.विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुचनाही शिक्षक व कर्मचारी यांच्याकडून देण्यात येत होत्या. शाळांचा परिसर बहरल्याचे चित्र सर्वत्र निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here