भुसावळ येथील लक्झरी-पिकअप वाहनाची धडक, चालक जागीच ठार

0
14
भुसावळ येथील लक्झरी-पिकअप वाहनाची धडक, चालक जागीच ठार

भुसावळ, प्रतिनिधी । शहरातील भरधाव लक्झरी व मालवाहू छोटा हत्ती वाहनांची समोरा – समोर धडक झाल्याने चालक जागीच ठार झाला आहे व दोन प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी बाजार पेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील भरधाव लक्झरी व मालवाहु छोटा हत्ती पिकअप वाहनात समोरा-समोर धडक होवून झालेल्या अपघातात पिकअप वाहनातील धुळ्याच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन सह प्रवासी जखमी झाले. राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर शनिवारी मध्यरात्री हा अपघात झाला. सुदैवाने लक्झरी उलटली नाही अन्यथा मोठी जीवीत हानी होण्याची भीती होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यवतमाळ येथून महेंद्र ट्रॅव्हल्सची लक्झरी (जी.जे.19 एक्स.9596) सुमारे 35 प्रवाशांना घेवून भरधाव वेगाने सुरतकडे निघाली असताना भुसावळ येथील रेल्वे उड्डाण पुलाजवळ जळगावकडून भुसावळकडे येणार्‍या मालवाहु पिकअप (एम.एच.18 बी.जी.04) वर आदळली. या अपघातातील पिकअपमधील चालक किशोर निंबा गिरासे (38, नगावबारी, देवपूर, धुळे) हे जागीच ठार झाले तर पिकअपमधील अन्य दोघे जखमी झाले तसेच लक्झरी चालकही जखमी झाला. अपघाताची माहिती कळताच पोलीस उपधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठचे प्रभारी निरीक्षक प्रताप इंगळे, पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार व पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here